Bar Council of India stays decision to cancel charter Big relief for Asim Sarode : विधीज्ञ असीम सरोदे यांना बार कौन्सिल ऑफ इंडियाने मोठा दिलासा दिलाय. असीम सरोदे यांची सनद रद्द करण्याच्या बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲन्ड गोवा यांच्या आदेशाला बार कौन्सिल ऑफ इंडियानं स्थगिती दिली आहे. दरम्यान, याबाबत x या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन सरोदेंनी प्रतिक्रिया दिली आहे. "सत्याचा विजय होण्याची सुरुवात कधीतरी होत असते. बार कौन्सिल ऑफ इंडिया चे आभार ! मी पुन्हा येतोय.....", असं सरोदे यांनी म्हटलंय.
ADVERTISEMENT
असीम सरोदे यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान न्यायव्यवस्था, राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची दखल घेत बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाने त्यांच्या विरोधात कठोर पावले उचलत त्यांची वकीलीची सनद तीन महिन्यांसाठी रद्द केली होती.
अॅडव्होकेट असीम सरोदे यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात न्यायव्यवस्था, राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष यांच्याबाबत केलेल्या काही विधानांना वादग्रस्त म्हणत एका व्यक्तीने बार कौन्सिलकडे तक्रार दाखल केली होती. त्यांच्यावर न्यायालयांची प्रतिष्ठा कमी करणारी, गैरजबाबदार आणि बदनामीकारक वक्तव्ये केल्याचा आरोप करण्यात आला होता. या विधानांमुळे लोकांमध्ये न्यायव्यवस्थेबद्दल अविश्वास निर्माण होऊ शकतो, असा दावा तक्रारदाराने केला होता.
सामाजिक कार्यकर्ते विश्वंभरी चौधरी यांची प्रतिक्रिया
सत्य परेशान हो सकता है, पराभूत नही! असीम सरोदे यांची सनद रद्द करण्याच्या बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲन्ड गोवा यांच्या आदेशाला बार कौन्सिल ऑफ इंडियानं स्थगिती दिली आहे. पुढील तारीख लवकरच कळेल. हे प्रकरण खरोखरंच व्यावसायिक गैरवर्तनुकीचं आहे का याबाबत सखोल तपासणी करूनच निर्णय द्यायला हवा असं बार कौन्सिल ऑफ इंडियाचा आदेश सांगतो. मुळातच हा अन्याय होता हे सर्वांना कळत होतं. या स्थगिती आदेशामुळे ते एका परीनं सिद्धच झालं. अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या असीमसह सर्व न्याययोद्ध्यांचं अभिनंदन.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











