NABARD Recruitment: सरकारी नोकरीच्या प्रयत्नात असणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. नाबार्ड फायनॅन्शिअल सर्व्हिसेज (NABFINS)मध्ये कस्टमर सर्व्हिस ऑफिसर (Customer Service Officer) च्या रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमधील उमेदवार या भरतीमध्ये सहभागी होऊ शकतात. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार nabfins.org या अधिकृत वेबसाइटवर जाऊ शकतात. भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 28 नोव्हेंबर 2025 पर्यंतच सुरू राहील.
ADVERTISEMENT
पात्रता आणि वयोमर्यादा
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी PUC/ 10+2 (12 वी) उत्तीर्ण असणं अनिवार्य आहे. फ्रेशर्स म्हणजेच संबंधित क्षेत्रात कार्याचा कोणताही अनुभव नसलेले उमेदवार सुद्धा या भरतीमध्ये सहभागी होण्यास पात्र आहेत. या व्यतिरिक्त, उमेदवारांचं कमाल वय 33 वर्षे निश्चित करण्यात आलं आहे. तसेच, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सुद्धा उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात येणार आहे.
हे ही वाचा: 'सुप्रियाताई तुम्ही माझ्या नातेवाईक..', तुळजापूर ड्रग्स प्रकरणात राणा जगजितसिंह पाटलांचं खरमरीत पत्र; काय म्हणाले?
कसा कराल अर्ज?
या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवार केवळ ऑनलाइन माध्यमातून अर्ज करू शकतात.
1. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम nabfins.org/Careers/ या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
2. आता ज्या राज्यासाठी अर्ज करायचा आहे, त्याच बॉक्समध्ये जाऊन अप्लाय लिंकवर क्लिक करा.
3. त्यानंतर मागितलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरा.
4. शेवटी, भरलेली माहिती तपासून फॉर्म सबमिट करा.
हे ही वाचा: "जावयाने मुलीचं नाकच कापून टाकलं..." सासूने गंभीर आरोप करत पोलिसात केली तक्रार!
याशिवाय, नाबार्डमध्ये असिस्टंट मॅनेजर ग्रेड A पदांच्या 92 रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि यासाठी उमेदवार 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करू शकतात. यासाठी, पात्र आणि इच्छुक उमेदवार या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. फॉर्म सबमिट करण्यासाठी उमेदवारांना प्रवर्गानुसार शुल्क भरणं अनिवार्य आहे. या भरतीसंदर्भात अधिक माहिती तपासण्यासाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात.
ADVERTISEMENT











