'सुप्रियाताई तुम्ही माझ्या नातेवाईक..', तुळजापूर ड्रग्स प्रकरणात राणा जगजितसिंह पाटलांचं खरमरीत पत्र; काय म्हणाले?
Ranajagjitsinha Patil letter to supriya sule about Tuljapur drugs case : 'सुप्रियाताई तुम्ही माझ्या नातेवाईक..', तुळजापूर ड्रग्स प्रकरणात राणा जगजितसिंह पाटलांचं खरमरीत पत्र; काय म्हणाले?
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'सुप्रियाताई तुम्ही माझ्या नातेवाईक..',
तुळजापूर ड्रग्स प्रकरणात राणा जगजितसिंह पाटलांचं खरमरीत पत्र; काय म्हणाले?
Ranajagjitsinha Patil letter to supriya sule about Tuljapur drugs case : तुळजापूर ड्रग्ज प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या आरोपांनंतर आता आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनीही त्यांना थेट पत्र लिहित सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे. या पत्रामुळे तुळजापूरच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. राणा पाटील सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर देताना काय म्हणाले? जाणून घेऊयात..
राणा पाटील यांचं पत्र जसच्या तसं
प्रति
मा.खा. सुप्रियाताई,
आदरणीय अजितदादा पवार आणि सुनेत्राआत्या ज्याप्रमाणे माझे नातेवाईक आहेत, त्याप्रमाणेच आपण सुद्धा माझ्या जवळच्या नातेवाईक आणि माझ्या थोरल्या बहीण आहात आणि त्याचा मला मनापासून आदर आणि अभिमान आहे.










