"जावयाने मुलीचं नाकच कापून टाकलं..." सासूने गंभीर आरोप करत पोलिसात केली तक्रार!

मुंबई तक

कौटुंबिक वादात तरुणाने आधी पत्नीला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. इतकेच नव्हे तर, मारहाणीत पतीने त्याच्या पत्नीचं नाक कापून टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

"जावयाने मुलीचं नाकच कापून टाकलं..."
"जावयाने मुलीचं नाकच कापून टाकलं..."
social share
google news

बातम्या हायलाइट

point

"जावयाने मुलीचं नाकच कापून टाकलं..."

point

सासूने गंभीर आरोप करत पोलिसात केली तक्रार!

Crime News: उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यात पती आणि पत्नीमधील कौटुंबिक वादातून भयानक घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. या वादात तरुणाने आधी पत्नीला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. इतकेच नव्हे तर, मारहाणीत पतीने त्याच्या पत्नीचं नाक कापून टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेत गंभीररित्या जखमी झालेल्या महिलेला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. सध्या, पीडितेची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. 

संबंधित घटनेसंदर्भात महिलेच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तक्रारीच्या आधारे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आता, पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र साहू नावाच्या तरुणाने सुनीता नावाच्या महिलेसोबत दहा वर्षांपूर्वी लग्न केलं होतं. या जोडप्याला तीन मुलं आहेत.

शिवीगाळ करत लाथा-बुक्क्यांनी मारहाण 

प्रकरणातील पीडितेच्या आईने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी जवळपास 4 वाजताच्या सुमारास राजेंद्र आणि सुनीतामध्ये काही कारणावरून मोठा वाद झाला. हा वाद इतका टोकाला पोहोचला की, राजेंद्रने रागाच्या भरात पीडितेसोबत भयानक कृत्य केलं. त्याने सुनीताला शिवीगाळ केली आणि निर्घृणपणे लाथा-बुक्क्यांनी तिला मारहाण केली.  त्यानंतर त्याने घरात असलेल्या धारदार शस्त्राने सुनीतावर हल्ला केला आणि तिचं नाक कापून टाकल्याचा आरोप आहे. या गंभीर हल्ल्यानंतर पीडिता रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळली. 

हे ही वाचा: पालघर: धावत्या ट्रेनमधून भाचीला दिलं ढकलून! घटनेत तरुणीचा दुर्दैवी मृत्यू, पोलीस म्हणाले की...

धारदार शस्त्राने पत्नीचं नाकच कापलं...

घटनेचा आरडाओरडा ऐकून शेजारी राजेंद्रच्या घरी पोहोचले आणि सुनीताला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. पीडितेच्या शरीरावरील गंभीर जखमा आणि अधिक रक्तस्त्राव लक्षात घेऊन डॉक्टरांनी तिला प्राथमिक उपचारानंतर गौरीगंज जिल्हा रुग्णालयात रेफर केलं. गौरीगंजहून तिला पुढील उपचारांसाठी रायबरेली येथील एम्स येथे पाठवण्यात आलं. सध्या तिच्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp