पालघर: धावत्या ट्रेनमधून भाचीला दिलं ढकलून! घटनेत तरुणीचा दुर्दैवी मृत्यू, पोलीस म्हणाले की...

मुंबई तक

एका व्यक्तीने धावत्या लोकल ट्रेनमधून आपल्या 16 वर्षीय भाचीला ढकलून दिल्याचं वृत्त आहे. या घटनेत पीडितेचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे.

ADVERTISEMENT

धावत्या ट्रेनमधून भाचीला दिला ढकलून!
धावत्या ट्रेनमधून भाचीला दिलं ढकलून!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

धावत्या ट्रेनमधून भाचीला दिला ढकलून!

point

घटनेत तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

Palghar Crime: पालघर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका व्यक्तीने धावत्या लोकल ट्रेनमधून आपल्या 16 वर्षीय भाचीला ढकलून दिल्याचं वृत्त आहे. या घटनेत पीडितेचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. आता या प्रकरणासंदर्भात पोलिसांनी आरोपीला अटक केल्याची माहिती आहे. मंगळवारी पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेची माहिती दिली. 

धावत्या लोकल ट्रेनमधून धक्का दिला 

मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुन सोनी नावाच्या एका तरुणाने वसईमध्ये आपल्या 16 वर्षांच्या भाचीला धावत्या लोकल ट्रेनमधून धक्का दिला. पीडित तरुणी ट्रेनमधून खाली पडली आणि त्यात तिचा मृत्यू झाला. सोमवारी भायंदर नाल्याल्यावर असलेल्या रेल्वे रूळावर संबंधित तरुणीचा मृतदेह आढळला. 

हे ही वाचा: निर्जनस्थळी घेऊन गेला अन् ओढणीने गळा दाबून हत्या! पालघरमध्ये अनैतिक संबंधाच्या संशयातून धक्कादायक घटना...

आरोपीला पोलिसांकडून अटक 

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेचा प्रत्यक्षदर्शी असलेल्या एका प्रवाशाकडून याबाबत माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे, पोलिसांनी अर्जुन सोनीला अटक केली. आरोपी तरुणाला भारतीय दंड संहिता (बीएनएस) च्या कलम 103(1) (खून) अंतर्गत अटक करण्यात आली आहे. या हत्येमागचं नेमकं कारण जाणून घेण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. 

हे ही वाचा: तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपीला भाजपने नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली?; राणा पाटलांनी पक्षाचे आदेश झुगारले?

पालघर जिल्ह्यातील धक्कादायक घटना 

काही दिवसांपूर्वी, पालघर जिल्ह्यातील मुंबई-वडोदरा महामार्गावरील पुलाच्या बांधकामाच्या ठिकाणी महिलेचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने आपल्या पत्नीची हत्या अगदी पूर्वनियोजित पद्धतीने केली होती. आरोपी पीडित महिलेला कोणत्या तरी बहाण्याने हायवेजवळील निर्जन स्थळी घेऊन गेला आणि तिथे तिच्याच ओढणीने गळा दाबून तिची हत्या केली. हत्येनंतर, आरोपी तिथून फरार झाला. सध्या, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून प्रकरणाचा खोल तपास केला जात आहे. 
 

हे वाचलं का?

    follow whatsapp