तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपीला भाजपने नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली? राणा पाटलांनी पक्षाचे आदेश झुगारले?

मुंबई तक

BJP nominated the main accused in the Tuljapur drug case : तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपीला भाजपने नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली?; राणा पाटलांनी पक्षाचे आदेश झुगारले?

ADVERTISEMENT

BJP nominated the main accused in the Tuljapur drug case
BJP nominated the main accused in the Tuljapur drug case
social share
google news

बातम्या हायलाइट

point

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपीला भाजपने नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिल्याची चर्चा;

point

राणा जगजितसिंह पाटलांनी पक्षाचे आदेश झुगारले?

तुळजापूर –गणेश जाधव : राज्यभर चर्चेत असलेल्या तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी विनोद उर्फ पिटू गंगणे यांना भाजपने नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिल्याची चर्चा सुरू असून, या घडामोडीमुळे तुळजापूरच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे. पिटू गंगणे यांनी आमदार राणा पाटील यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना थेट नगराध्यक्ष पदाचा पक्षाचा फॉर्म देण्यात आल्याची माहिती स्थानिक राजकीय वर्तुळात फिरत आहे. या हालचालीवर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतल्यामुळे तुळजापूरमधील राजकीय वातावरण तापले आहे.

वरिष्ठ नेतृत्वाच्या सूचना डावलून घेतलेला निर्णय

भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून महंत इच्छागिरी गगनगिरी महाराज किवा अन्य महंत यांना उमेदवारी देण्याच्या स्पष्ट सूचना असल्याचे समजते. मात्र या आदेशांकडे दुर्लक्ष करून आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि काही स्थानिक नेत्यांनी पिटू गंगणे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करून पक्षश्रेष्ठींचे निर्देश धुडकावल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे तुळजापूर विधानसभा क्षेत्रात भाजपमध्ये खरे निर्णय कोण घेतो? हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

जामिनावर असलेला आरोपी, विरोधकांचा तीव्र आक्षेप

पिटू गंगणे हा तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी मानला जातो. या प्रकरणात त्याने पोलिसांना सहकार्य करत भांडा फोडल्याचा दावा भाजप समर्थक करत आहेत. तर दुसरीकडे विरोधकांचे मत वेगळे आहे. त्यांच्या मते पिटू गंगणेच्याच माध्यमातून अनेक युवकांना या ड्रग्जचे व्यसन लागले आणि संपूर्ण प्रकरणाची मुळे त्याच्याकडेच पोहोचतात. घटनेनंतर पिटू गंगणे तब्बल एक महिन्यापेक्षा जास्त काळ तुरुंगात होता आणि सध्या तो जामिनावर आहे. अशा परिस्थितीत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीस शहराच्या पहिल्या नागरिकपदाची, म्हणजेच नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देणे कितपत योग्य, असा सवाल विरोधकांनी जोरदारपणे उपस्थित केला आहे. यापूर्वी महसूल मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी एका कार्यक्रमात पिटू गंगणे यांचे कौतुक करीत वाजवा टाळ्या असे म्हटल्याने राज्यभरात मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता. त्यावेळी भाजपच्या भूमिकेवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

राणा पाटील यांच्यावर पुन्हा टीका

हे वाचलं का?

    follow whatsapp