अंबरनाथमध्ये तरुणावर 8-9 जणांकडून कोयत्याने सपासप वार, घटनेचा थरार CCTV मध्ये कैद

Ambernath crime : महापालिका निवडणुकीपूर्वी अंबरनाथ जावसई परिसरात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका तरुणावर तब्बल 8-9 जणांच्या टोळक्यांनी तलवार कोयत्यांसह धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याची मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे.

ambernath crime

ambernath crime

मुंबई तक

19 Nov 2025 (अपडेटेड: 19 Nov 2025, 02:34 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल

point

हल्ल्यात तरुणाच्या हाता-पायावर सपासप वार 

point

अंबरनाथमध्ये काय घडलं?

Ambernath Crime : महापालिका निवडणुकीपूर्वी अंबरनाथ जावसई परिसरात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका तरुणावर तब्बल 8-9 जणांच्या टोळक्यांनी तलवार कोयत्यांसह धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याची मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. फुलेनगर वाडीतील असलेल्या सुधीर ओमप्रकाश सिंह हा तरुण आपल्या कुटुंबासह राहतो. तसेच त्याचा याच परिसरात एक तबेला देखील आहे. तो एका ठिकाणी वेल्डिंगचं काम करण्यासाठी गेला असताना त्याच्यावर काही लोकांनी हल्ला चढवल्याचं सांगण्यात येत आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : आयटी इंजिनिअर नवऱ्यावर पत्नीचा अत्याचार, सहा महिने तुरुंगात बसून लिहिलं पुस्तक, पुरुष हक्क दिनाची मन हेलावणारी घटना

घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल

या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तरुणाने कोयत्यासह इतर घातक हत्यारे आणण्यात आली होती. त्याचा वापर करत तरुणावर सपासप वार करण्यात आले. या झालेल्या हल्ल्यात तरुण गंभीररीत्या जखमी झाल्याचे वृत्त आहे. तरुण सध्या जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. 

https://x.com/atuljmd123/status/1991016959425798186?s=20

हल्ल्यात तरुणाच्या हाता-पायावर सपासप वार 

या हल्ल्यात पीडित सुधीर सिंहच्या पाठिवर आणि हाता-पायावर गंभीर जखमा झाल्या आहेत. तेव्हा उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर हल्लेखोरांनी पीडितावर हल्ला करून त्याने घटनास्थळावरून पळ काढला. तेव्हा पीडितेच्या मोटारसायकलची तोडफोड करण्यात आली. 

हे ही वाचा : थंडीने कुडकुडू लागले म्हणून रुममध्ये शेगडीत शेकोटी पेटवली, पण झोपेत श्वास घेता आला नाही, 3 मित्रांचा गुदमरुन मृत्यू

या संपूर्ण घटनेचा थरार हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी आता अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी हल्लेखोरांच्या टोळीचा शोध सुरु केला आहे. शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरलं आहे. 

    follow whatsapp