International Men Day : देशात स्त्री-पुरुष समानतेचे अनेकजण संदेश देताना फिरत असताना पण, या देशात स्त्री-पुरुष समानता खरंच आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दोघांचे आयुष्य एकमेकांसाठी तितकेच महत्त्वाचे असते. पण या देशात महिलांचे हक्क सांगणारे अनेक कायदे अंमलात आणले गेले आहेत. परंतु पुरुषांवरील अन्याय आणि अत्याचारांचं काय? असा प्रश्न आ.. वासून पुरुषांच्या समोर आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : मंगळाचा महागोचर योग, काही राशीतील लोकांच्या जीवनात धोक्याचं सावट
आयटी इंजिनिअर पुरुषावर पत्नीचा अत्याचार
एका आयटी इंजिनिअर पुरुषावर त्याच्याच पत्नीने अत्याचार केल्याच्या आरोपाखाली त्याला तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. तेव्हा त्याने तुरुंगात आपल्या आयुष्यातील जगलेलं वास्तव आणि मनातील सल त्याने शंभर पानी पुस्तकातून नमूद केली आहे. अशातच प्रसिद्ध केलेल्या पुस्तकाची एक प्रत या इंजिनिअरने न्यायाधीश व वकिलांनादेखील भेट दिली.
पुरुष हक्क दिना दिवशी पीडित पुरुषाची गोष्ट
आज 19 नोव्हेंबर हा दिवस पुरुष हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी नाशिक तालुक्यात एका पुरुषावर त्याच्या पत्नीने केलेल्या अत्याचाराबाबतची महत्त्वाची घटना समोर आली. आयटी इंजिनिअर म्हणून कार्यरत असलेला पुरुष खडतर प्रयत्न करतो आणि कुटुंबाला आधार देतो. त्याचा विवाह हा त्याच्याच जिल्ह्यातील एका तरुणीशी झाला. नंतर ते दाम्पत्य नोकरीसाठी गुजरात राज्यात स्थायिक झाले. त्यानंतर पत्नीने माहेरच्या गावी स्थायिक होऊ यासाठी पतीकडे तगादा लावण्यास सुरुवात केली.
हे ही वाचा : Govt Job: सरकारी नोकरीच्या प्रयत्नात आहात? मग, 'नाबार्ड'च्या 'या' भरतीसाठी लवकरच करा अप्लाय...
परंतु, तिथे जाऊन नेमकं काय करायचं? त्यावरून त्यांच्या सतत खटके उडू लागले होते. पत्नीने आपला हट्टा पूर्ण केला आणि तिने सरळ आपलं माहेर गाठलं. तेव्हा तिने घटस्फोट अन् नंतर खावटी देखील मागितली होती. तेव्हा आठ हजारांची खावटी न्यायालयाने मंजूरही केली, त्याचक्षणी आपली कसलीही चूक नसल्याने आपण खवटीतील एकही रुपया दिला नसल्याचा त्यांनी चंग बांधला. तेव्हा न्यायालयाने सहा महिन्यांची पुरुषाला शिक्षा सुनावली, हीच मनातील सल पीडित पुरुषाने तुरुंगात बसून पुस्तकात मांडली.
ADVERTISEMENT











