निर्जनस्थळी घेऊन गेला अन् ओढणीने गळा दाबून हत्या! पालघरमध्ये अनैतिक संबंधाच्या संशयातून धक्कादायक घटना...

पालघर जिल्ह्यातील मुंबई-वडोदरा महामार्गावरील पुलाच्या बांधकामाच्या ठिकाणी महिलेचा मृतदेह आढळून आला होता. आता पोलिसांनी 25 वर्षीय महिलेच्या हत्येसंदर्भात खुलासा केला आहे.

अनैतिक संबंधाच्या संशयातून धक्कादायक घटना...

अनैतिक संबंधाच्या संशयातून धक्कादायक घटना...

मुंबई तक

• 11:03 AM • 19 Nov 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

निर्जनस्थळी घेऊन गेला अन् ओढणीने गळा दाबून पत्नीची हत्या!

point

पालघरमध्ये अनैतिक संबंधाच्या संशयातून धक्कादायक घटना...

Crime News: 13 नोव्हेंबर रोजी पालघर जिल्ह्यातील मुंबई-वडोदरा महामार्गावरील पुलाच्या बांधकामाच्या ठिकाणी महिलेचा मृतदेह आढळून आला होता. आता पोलिसांनी 25 वर्षीय महिलेच्या हत्येसंदर्भात खुलासा केला आहे. पोलिसांनी मृत महिलेचा 43 वर्षीय पती साकीर अली मुस्तफअली मन्सूरी याला अटक केल्याची माहिती आहे. आरोपी पती मूळचा उत्तर प्रदेशचा असून तो सध्या गुजरातमधील सुरत येथे ड्रायव्हर म्हणून काम करतो. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीला त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता आणि याच संशयातून पतीने आपल्या पत्नीची हत्या केली. 

हे वाचलं का?

पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, एका हायवेजवळ संबंधित महिलेचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला. महिलेचा खून तिच्याच स्कार्फने गळा दाबून करण्यात आला असल्याचं प्राथमिक तपासात दिसून आलं. या आधारे, अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 103(1) (खून) अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला.

तपासाच्या सुरुवातीला कोणतेही ठोस पुरावे मिळाले नसल्याने, पोलिसांनी बरीच पथके तयार केली. त्यांनी मृत महिलेचा फोटो सर्वत्र पाठवण्यात आला आणि त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी पुढे येऊन तिची ओळख पटवली. ओळख पटल्यानंतर, पोलीस तपासात मृत महिलेच्या कौटुंबिक संबंधांवर आणि तिच्या पतीच्या वागण्यावर लक्ष ठेवण्यात आलं. 

हे ही वाचा: 'अजित पवार सगळ्यांचा नाद करा.. पण..', ज्यांच्या आशीर्वादाने पूर्ण हयात घालवली त्यांनाच बाळराजे पाटलांनी ललकारलं

पत्नीवर विवाहबाह्य संबंधाचा संशय 

तपासादरम्यान, पीडित महिलेचा पती साकीर अली हा घटना घडल्यापासून बेपत्ता असल्याचं आढळून आलं. पोलिसांनी त्याचं लोकेशन शोधून काढले आणि सोमवारी महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील अछाड परिसरात त्याला अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान, आरोपीने कबूल केलं की तो त्याला त्याच्या पत्नीवर अनैतिक संबंधाचा संशय होता आणि तो सतत तिचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप करत होता. या संशयातूनच आरोपी पतीने  महिलेची निर्घृण हत्या केली. 

हे ही वाचा: राजन पाटलांच्या मुलाने अजितदादांना एकेरी भाषेत ललकारलं, आता रोहित पवार म्हणाले..,'अंगात मस्ती..'

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने आपल्या पत्नीची हत्या अगदी पूर्वनियोजित पद्धतीने केली होती. आरोपी पीडित महिलेला कोणत्या तरी बहाण्याने हायवेजवळील निर्जन स्थळी घेऊन गेला आणि तिथे तिच्याच ओढणीने गळा दाबून तिची हत्या केली. हत्येनंतर, आरोपी तिथून फरार झाला. सध्या, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून प्रकरणाचा खोल तपास केला जात आहे. 
 

    follow whatsapp