'अजित पवार सगळ्यांचा नाद करा.. पण..', ज्यांच्या आशीर्वादाने पूर्ण हयात घालवली त्यांनाच बाळराजे पाटलांनी ललकारलं
Balraje Patil on Angar Nagar Parishad Election 2025 Ajit Pawar : 'अजित पवार सगळ्यांचा नाद करा.. पण..', ज्यांच्या आशीर्वादाने पूर्ण हयात घालवली त्यांनाच बाळराजे पाटलांनी ललकारलं
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'अजित पवार सगळ्यांचा नाद करा.. पण अनगरकरांचा नाही,
ज्यांच्या आशीर्वादाने पूर्ण हयात घालवली त्यांनाच बाळराजे पाटलांनी ललकारलं
Balraje Patil on Angar Nagar Parishad Election 2025 Ajit Pawar : 'अजित पवार सगळ्यांचा नाद करा, पण अनगरकरांचा नाद करायचा नाही', अनगर येथील जल्लोष करताना माजी आमदार राजन पाटील यांचे ज्येष्ठ सुपुत्र विक्रांत उर्फ बाळराजे पाटील यांनी उपमुख्यमंत्र्यांना ललकारलंय. अनगरमध्ये कार्यकर्त्याच्या खांद्यावर बसून त्यांनी अजित पवारांना इशारा दिलाय. सध्या त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
बाळराजे पाटलांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
अनगर नगरपंचायतीची निवडणूक राज्यात सर्वाधिक चर्चेची ठरली आहे. या निवडणुकीत माजी आमदार राजन पाटील यांच्या साम्राज्याला प्रथमच आव्हान दिल्याने आतापर्यंतच्या बिनविरोधच्या परंपरेला ब्रेक लागला होता. अनगरच्या नगराध्यक्षपदासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उज्वला थिटे यांनी पोलिस बंदोबस्तात उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र, छाननीत त्यांचा अर्ज बाद झाला. त्यानंतर राजन पाटील समर्थकांनी नगरपंचायतीसमोर जल्लोष केला या वेळी पाटील यांचे थोरले चिरंजीव विक्रांत ऊर्फ बाळराजे पाटील यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चॅलेंज केले आहे. त्याची सोलापूर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होताना दिसत आहे.
अनगर ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर झाल्यानंतर पहिलीची निवडणूक होती. त्या निवडणुकीत भाजपकडून माजी आमदार राजन पाटील यांच्या सून प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला होता.आतापर्यंतच्या परंपरेनुसार अनगर नगरपंचायतीची निवडणूक बिनविरोध होईल, अशी अपेक्षा पाटील समर्थकांना होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसकडून उज्वला थिटे यांनी पोलिस बंदोबस्तात नगराध्यक्षपदाचा अर्ज दाखल केला होता.
उज्वला थिटे यांना पोलिस बंदोबस्तात जाऊन अर्ज दाखल करावा लागला, यामुळे अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीची राज्यभरात चर्चा झाली. तसेच बिनविरोधची पंरपराही खंडीत झाली. मात्र, छाननीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार उज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाला. त्यांच्या अर्जावर अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी आक्षेप घेतला. त्यानुसार थिटे यांचा अर्ज बाद झाला आहे.










