Kolhapur Crime : एका व्यवसायिक डॉक्टर असलेल्या मुलीने आपल्याच वडिलांच्या बोटाचा जोराचा चावा घेतला. चावा इतरा जोराचा होता की, तिने आपल्या वडिलांचे बोटंच तोडून टाकल्याची धक्कादायक घटना आहे. या प्रकरणात वडील गणपतराम विष्णू हाळवणकर (वय 87) हे गंभीररीत्या जखमी झाल्याचे वृत्त आहे. तर दुसरीकडे मुलगी डॉ. शुभांगी सुनील निकम (वय 43) असं डॉक्टर मुलीचं नाव आहे. या प्रकरणात मुलीविरुद्ध गडहिंग्लज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची कोल्हापुरात चर्चा सुरु आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : छत्रपती संभाजीनगरात स्पर्धा परीक्षेसाठी गेला तरुण, 25 वर्षीय तरुणीशी प्रेम अन् कॅफेत अत्याचार, गर्भपात करत... मोठं कांड
नेमकं प्रकरण काय?
या प्रकरणात पोलिसांनी सांगितलं की, गणपतराव आणि दोन मुली डॉ. शुभांगी आणि ज्योती यांच्या संपत्तीच्या वाटणीवरून वाद झाला. याच पार्श्वभूमीवर ड. शुभांगी हिने पैशाच्या कारणावरून 11 आणि 14 नोव्हेंबर रोजी शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिली होती. अशातच आता वडील गणपतरावांनी पोलिसांत केली होती.
पेट्रोल पंपाजवळ मुलीने वडिलांच्या अंगावर गाडी घालत बोटाचा तुकडा पाडला
दरम्यान, रविवारी (ता.15) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास गणपतराव फिरण्यासाठी घरातून बाहेर पडले असता, पेट्रोल पंपाजवळ येताच मुलीने वडिलांच्या अंगावर दुचाकी बाईक घातली. त्याचक्षणी वडील हे रस्त्यावर कोसळल्याची माहिती समोर आली.
नंतर लेकीनेच वडिलांना शिवीगाळ केली
तेव्हा मुलीने आपल्याच वडिलांना शिवीगाळ करत म्हणाली की, माझ्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करतो काय, तुला मी जिवंत सोडणार नाही, असं म्हणत तिने दुचाकी थांबवली आणि वडिलांच्या छतीवल लाथ मारली. नंतर वडिलांनी मारहाण करण्यात आली. तेव्हा तिने उजव्या हाताच्या बोटाचा चावा घेत, तुकडाच पाडल्याने रक्तस्त्राव झाला. तत्काळपणे गणपतरावांनी याची माहिती मुलगा उदयला दिली आहे.
हे ही वाचा : 12 वर्षांनंतर, गुरु आणि मंगळाची झाली शुभ युती 'या' राशीतील लोकांना कधीच पडणार नाही पैशांची कमी
उदय हा घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्याने आपल्या वडिलांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेला. येथील प्राथमिक उपचारानंतर त्यांना अधिक उपचारासाठी सीपीआरला पाठवण्यात आले. या प्रकरणात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आणि शुभांगीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
ADVERTISEMENT











