छत्रपती संभाजीनगरात स्पर्धा परीक्षेसाठी गेला तरुण, 25 वर्षीय तरुणीशी प्रेम अन् कॅफेत अत्याचार, गर्भपात करत... मोठं कांड

मुंबई तक

chhatrapati sambhajinagar crime : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाने माणुसकीला काळिमा फासणारं धक्कादायक कृत्य केलं आहे. एका तरुणीशी मैत्री करून तिच्यावर एका कॅफेत लैंगिक अत्याचार करत तिचा गर्भपात केल्याचा मन हेलावून टाकणारा प्रकार उघडकीस आला आहे.

ADVERTISEMENT

chhatrapati sambhajinagar crime
chhatrapati sambhajinagar crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नेमकं प्रकरण काय? 

point

कॅफेत तरुणीशी शरीरसंबंध ठेवून तिला गर्भवती केलं

point

भागवतच्या कुटुंबीयांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा

point

भयंकर प्रकरण

chhatrapati sambhajinagar crime : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाने माणुसकीला काळिमा फासणारं धक्कादायक कृत्य केलं आहे. एका तरुणीशी मैत्री करून तिच्यावर एका कॅफेत लैंगिक अत्याचार करत तिचा गर्भपात केल्याचा मन हेलावून टाकणारा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात अत्याचार करणाऱ्या तरुणावर फौजदारीसह बलात्कार आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचे नाव भागवत ज्ञानोबा मुलगीर असे आहे. हा आरोपी परभणी तालुक्यातील रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे. 

हे ही वाचा : शुक्र आणि बुध ग्रहाची दुर्मिळ युती, आता 'या' राशींचे नशीब पालटणार

नेमकं प्रकरण काय? 

भागवत हा नाशिक अकादमी पोलीस उपनिरीक्षकाचे प्रशिक्षण घेत होता. या प्रकरणात भागवतच्या कुटुंबीयांना देखील सहआरोपी म्हणून या प्रकरणात त्यांचं नाव जोडलं गेलं असल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.अशातच एक 25 वर्षीय तरुणी आणि भागवत काही महिन्यांपूर्वी शहरात स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते. दोघेही परभणी जिल्ह्यातील असल्याने दोघांची चांगली ओळख झाली. नंतर ओळखीचे रुपांतर हे प्रेमात झाले. 

कॅफेत तरुणीशी शरीरसंबंध ठेवून तिला गर्भवती केलं

24 फेब्रुवारी 2024 मध्ये त्यांचे क्रांती चौकातील एका कॅफेत तरुणीशी शरीरसंबंध ठेवून तिला गर्भवती केल. हे प्रकरण समजताच तरुणाने तिला जातीवाचक शिवीगाळ करून गोळ्या देऊन गर्भपात केला. तसेच तिचे अनेक प्रायव्हेट व्हिडिओ शेअर करेन, अशी धमकी दिली. नंतर भागवत हा पोलीस उपनिरीक्षक म्हणून उत्तीर्ण झाला.

हे ही वाचा : बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक.. उद्धव ठाकरेंची नियुक्ती, 'ही' आहे पडद्यामागची डावपेच आणि कुरघोडींची रंजक Inside स्टोरी

भागवतच्या कुटुंबीयांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा

दरम्यान, भागवतने तरुणीला सर्व ठिकाणाहून ब्लॉक केलं. तसेच तिने भागवतच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती दिली. तेव्हा त्यांनी सांगितलं की, 'तुला जे करायचं आहे ते कर' असे म्हणून धमकावले. नंतर संतप्त होऊन तरुणीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. क्रांती चौक पोलीस ठाण्यात बलात्कार आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

हे वाचलं का?

    follow whatsapp