बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक.. उद्धव ठाकरेंची नियुक्ती, 'ही' आहे पडद्यामागची डावपेच आणि कुरघोडींची रंजक Inside स्टोरी
बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या चाव्या अखेर उद्धव ठाकरेंकडेच आल्या आहेत. मात्र या न्यासाच्या नियुक्तीसाठी पडद्यामागे अनेक राजकीय डावपेच खेळले गेले. जाणून घ्या त्याचविषयी सविस्तर.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बाळासाहेब ठाकरे स्मारक न्यास नियुक्त्यांमागील सहा महिन्यांचा वाद अखेर संपला
उद्धव ठाकरे अध्यक्ष, आदित्य सदस्य, शिशिर शिंदे व पराग आळवणी यांचा समावेश
स्मारक न्यासासाठी नियुक्ती करताना खेळले गेले अनेक राजकीय डावपेच
मुंबई: शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाच्या (17 नोव्हेंबर) अवघ्या दोन दिवस आधी महायुती सरकारने बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक सार्वजनिक न्यासाच्या नियुक्त्या जाहीर केल्या. ज्याचं अध्यक्ष पद हे उद्धव ठाकरेंना देण्यात आलं. तर यासोबत इतर सदस्यांची देखील नियुक्ती करण्यात आली. पण या सगळ्या नियुक्त्यांआधी पडद्यामागे बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत. त्याचीच inside स्टोरी आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
त्याचं झालं असं की, गेल्या अनेक वर्षापासून स्मारकाच्या नियुक्त्या रखडल्या होत्या. अखेर 15 नोव्हेंबर 2025 रोजी या नियुक्त्यांवर एकमत झाले असून, ठाकरे कुटुंबीयांचेच वर्चस्व तिथे कायम राहिले आहे.
शुक्रवारी (15 नोव्हेंबर) जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार
अध्यक्ष : उद्धव बाळासाहेब ठाकरे (पाच वर्षांसाठी)
सचिव : सुभाष देसाई
सदस्य : आदित्य ठाकरे (पाच वर्षांसाठी)










