'एखाद्या माणसाचा पक्ष बळकावून घेताय..', राज ठाकरेंच्या पत्नी कोणावर भडकल्या?
Raj Thackeray wife Sharmila Thackeray got angry on Supreme Court : 'एखाद्या माणसाचा पक्ष बळकावून घेताय..', राज ठाकरेंच्या पत्नी कोणावर भडकल्या?
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'एखाद्या माणसाचा पक्ष बळकावून घेताय..'
राज ठाकरेंच्या पत्नी कोणावर भडकल्या?
Raj Thackeray wife Sharmila Thackeray got angry on Supreme Court : "एखाद्या माणसाचा पक्ष आहे, तो पक्षच तुम्ही बळकावून घेताय. हे चुकीचं आहे. तुम्ही न्याय कोणाकडे मागणार? आपण न्याय देवतेकडे पाहातो. न्याय देवता एवढ्या महत्त्वाच्या केसमध्ये वेळ देत नाही. आता जानेवरीमधील तारीख दिली आहे. तो पर्यंत निवडणुका होऊन जातील. मग याला काहीच अर्थ उरत नाही. एवढ्या महत्त्वाच्या केसचा तीन वर्षे उलटले तरी निकाल लागत नाही", असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी केलंय. शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते प्रभादेवी येथे एका कॅफेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी, पत्रकारांशी बोलताना त्यांनी विविध प्रश्नांवर उत्तरे दिली. यावेळी त्या बोलत होत्या. काही महिन्यांपूर्वी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे मराठीच्या मुद्द्यावरुन एकत्र आलेल्या पाहायला मिळाले. त्यानंतर ते अनेकदा एकत्र देखील पाहायला मिळाले होते. दरम्यान, आता राज ठाकरे यांच्या शर्मिला ठाकरे शिवसेना फुटीबाबत उद्धव ठाकरेंची बाजू घेतना दिसत आहेत.
हेही वाचा : भाजपचीही घराणेशाही जोमात, एकाच कुटुंबातील सहा जणांना दिली उमेदवारी, कोणत्या जिल्ह्यात लढणार निवडणूक?
पार्थ पवारांच्या जमीन घोटाळ्याबाबतही भाष्य
अमित ठाकरेंवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यासंदर्भात बोलताना, मला अभिमान आहे, मी पण वाट बघते माझ्यावर कधी केस होते, अशी प्रतिक्रिया शर्मिला ठाकरे यांनी व्यक्त केली. यांना निवडणुकीसाठी फक्त महाराज पाहिजे, किल्ल्यावर हे नमो सेंटर उभारणार आहेत. किल्ले हायजॅक करण्याचा प्रयत्न आहेत. पण, आम्ही होऊ देणार नाही. निवडणुकीसाठी यांना केवळ महाराज दिसतात. पंतप्रधान तिथं येऊन गेले, पण त्यांना वेळ शिवरायांच्या पुतळ्याच्या लोकार्पणासाठी वेळ मिळाला नसेल, असे म्हणत लेकावरील दाखल गुन्ह्यासंदर्भात भूमिका मांडली. तसेच, 1800 कोटींचा जामीन घोटाळा होतो, पण गुन्हा दाखल होत नाही, असे म्हणत पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळ्यावरही त्यांनी भाष्य केलं.










