भाजपचीही घराणेशाही जोमात, एकाच कुटुंबातील सहा जणांना दिली उमेदवारी, कोणत्या जिल्ह्यात लढणार निवडणूक?

मुंबई तक

Nanded Politics : भाजपचीही घराणेशाही जोमात, एकाच कुटुंबातील सहा जणांना दिली उमेदवारी, कोणत्या जिल्ह्यात लढणार निवडणूक?

ADVERTISEMENT

Nanded Politics
Nanded Politics
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भाजपचीही घराणेशाही जोमात

point

एकाच कुटुंबातील सहा जणांना दिली उमेदवारी

point

कोणत्या जिल्ह्यात लढणार निवडणूक?

Nanded Politics :  लोहा (नांदेड): स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना कार्यकर्त्यांची ताकद मोजण्याची संधी मानली जाते, असा सर्वसाधारण समज आहे. मात्र प्रत्यक्ष चित्र वेगळंच दिसत आहे. पक्षांतर्गत लोकशाही आणि घराणेशाहीविरोधी भूमिका जाहीरपणे मांडणाऱ्या पक्षांच्याही गोटात नातलगांना मोठ्या प्रमाणात उमेदवारी दिली जात असल्याचं लोहा नगरपरिषद निवडणुकीत स्पष्ट होत आहे. भाजपने लोहा नगरपरिषदेच्या निवडणुकीत एकाच कुटुंबातील तब्बल सहाजणांना तिकीट देऊन राजकीय चर्चांना उधाण आणलं आहे.

भाजपने नगराध्यक्षपदासाठी गजानन सूर्यवंशी यांच्या नावाची घोषणा केली. त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबातील पाच सदस्यांना नगरसेवकपदाच्या उमेदवारीची संधी मिळाली आहे. गजानन सूर्यवंशी यांच्या पत्नी गोदावरी सूर्यवंशी (प्रभाग 7 अ), भाऊ सचिन सूर्यवंशी (प्रभाग 1 अ), भावजय सुप्रिया सूर्यवंशी (प्रभाग 8 अ), मेव्हणा युवराज वाघमारे (प्रभाग 7 ब) आणि भाच्याची पत्नी रीना व्यवहारे (प्रभाग 3) अशा सहा सदस्यांना तिकीट देऊन भाजपने घराणेशाहीविरोधी भूमिकेवरच प्रश्न निर्माण केले आहेत.

राजकीय वर्तुळात यावर जोरदार चर्चा सुरू असून, भाजप ‘घराणेशाहीला विरोध’ करत असल्याचा दावा कितपत खरा हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. लोह्यात उमेदवार जाहीर झाल्यापासून विरोधकांनीही ही बाब हाणून पाडण्यास सुरुवात केली आहे.

लोह्यात तिरंगी लढत तीव्र

लोहा नगरपरिषद ही आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे मजबूत प्रभावक्षेत्र म्हणून ओळखली जाते. दहा प्रभागांसाठी वीस नगरसेवकांची निवडणूक होत असून, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि काँग्रेस यांच्यात तिरंगी सामना रंगणार आहे. नांदेड जिल्ह्यातील स्थानिक निवडणुका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजप लढवत आहे. चव्हाण यांच्या प्रवेशामुळे जिल्ह्यात पक्षसंघटन मजबूत झाल्याचं मानलं जातं, मात्र लोह्यातील उमेदवारीतून उफाळलेल्या घराणेशाहीच्या मुद्द्यामुळे भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp