लग्न कर म्हणून मागे लागल्याने मामा संतापला, भाचीला थेट धावत्या ट्रेनमधून ढकललं, वसईतील धक्कादायक घटना

पीडित तरुणीचे तिच्या मामासोबत प्रेमसंबंध होते आणि त्याच्यासोबतच लग्न करण्यासाठी ती घरातून पळून गेली होती. पण, मामासोबत ट्रेनमधून जात असताना आरोपीने तिच्यासोबत भयंकर कृत्य केलं.

मामाने धावत्या ट्रेनमधून भाचीला दिलं ढकलून...

मामाने धावत्या ट्रेनमधून भाचीला दिलं ढकलून...

मुंबई तक

20 Nov 2025 (अपडेटेड: 20 Nov 2025, 01:17 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

लग्न कर म्हणून मामाच्या मागे लागली अन्...

point

मामाने धावत्या ट्रेनमधून भाचीला दिलं ढकलून!

point

वसईतील धक्कादायक घटना

Mumbai Crime: एका व्यक्तीने आपल्या 16 वर्षांच्या भाचीला ट्रेनमधून ढकलून दिल्याची बातमी समोर आली होती. या घटनेत तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. आरोपी तरुणाने त्याच्या भाचीसोबत असं कृत्य करण्यामागचं नेमकं कारण समोर आलं आहे. खरं तर, मृत तरुणी ही मामाच्या प्रेमात होती आणि तिला तिच्या मामासोबतच लग्न करायचं होतं. मात्र, ती सतत आरोपीकडे लग्नाचा तगादा लावत असल्याने त्याने धावत्या ट्रेनमधून तरुणीला ढकलून दिलं. नेमकं काय घडलं? 

हे वाचलं का?

घर सोडून मामाकडे निघून गेली  

पीडित तरुणी ही तिच्या मामासोबत प्रेमसंबंधात होती. ती नेहमी आरोपीवर लग्नासाठी दबाव आणत होती. त्यामुळे, शनिवारी भाची घर सोडून वसईत मामाच्या घरी गेली. परंतु, मुलगी घरातून अचानक गायब झाल्याने पीडितेच्या कुटुंबियांना तिची चिंता वाटू लागली. तरुणीच्या आईने लगेच वालीव पोलीस स्टेशनमध्ये आपली मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

हे ही वाचा: पोटच्या मुलीवर तीन वेळा बलात्कार... नराधम बापाला न्यायालयाकडून 178 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा!

लग्न करण्यासाठी सतत दबाव 

सोमवारी आरोपी तरुण लोकल ट्रेनमधून आपल्या भाचीला घेऊन भायंदरवरून नालासोपारा येथे जात होता. दरम्यान, ट्रेन नायगाव भायंदरदरम्यान पोहोचताच आरोपी मामाने आपल्या 16 वर्षांच्या भाचीला धावत्या लोकल ट्रेनमधून धक्का दिला. त्यानंतर, पीडित तरुणी ट्रेनमधून खाली पडली आणि त्यात तिचा मृत्यू झाला. सोमवारी भायंदर नाल्यावर असलेल्या रेल्वे रूळावर संबंधित तरुणीचा मृतदेह आढळला. लग्न करण्यासाठी भाची मामावर सतत दबाव आणत असल्याने आरोपीन वैतागून तिची हत्या केल्याचं सांगितलं जात आहे. 

हे ही वाचा: सॉरी मम्मी, माझी बॉडी दान करा, शौर्य पाटीलची मेट्रो स्टेशनवरुन उडी मारुन आत्महत्या, धक्कादायक कारण समोर

पोलिसांची माहिती 

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेचा प्रत्यक्षदर्शी असलेल्या एका प्रवाशाकडून याबाबत माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे, पोलिसांनी अर्जुन सोनीला अटक केली. आरोपी तरुणाला भारतीय दंड संहिता (बीएनएस) च्या कलम 103(1) (खून) अंतर्गत अटक करण्यात आली आहे. या हत्येमागचं नेमकं कारण जाणून घेण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. 

    follow whatsapp