पोटच्या मुलीवर तीन वेळा बलात्कार... नराधम बापाला न्यायालयाकडून 178 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा!

मुंबई तक

एका पोक्सो न्यायालयाने आपल्या 11 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी 40 वर्षीय वडिलांना 178 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

ADVERTISEMENT

पोटच्या मुलीवर तीन वेळा बलात्कार...
पोटच्या मुलीवर तीन वेळा बलात्कार...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पोटच्या मुलीवरच तीन वेळा बलात्कार...

point

नराधम बापाला न्यायालयाकडून 178 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा!

Crime News: बाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक बातमी समोर आली आहे. केरळमध्ये वडिलांनीच आपल्या 11 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचं वृत्त आहे. मंजेरी येथील एका पोक्सो न्यायालयाने आपल्या 11 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी 40 वर्षीय वडिलांना 178 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. यासंबंधी न्यायाधीश एएम अशरफ यांनी आरोपीला 11 लाख रुपयांचा दंडही ठोठावला असल्याची माहिती आहे. 

आपल्याच मुलीवर तीन वेळा बलात्कार

प्रकरणातील आरोपी व्यक्तीने जानेवारी 2022 ते जानेवारी 2023 दरम्यान आपल्याच घरात त्याच्या अल्पवयीन मुलीवर तीन वेळा बलात्कार केला. इतकेच नव्हे तर, पीडितेने तिच्या वडिलांच्या घाणेरड्या कृत्याबाबत कोणाला सांगितलं तर तिला ठार मारण्याची धमकी सुद्धा त्याने दिली. आता, न्यायालयाकडून आरोपी वडिलांना पॉक्सो कायद्याच्या गंभीर कलमांखाली 40 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

हे ही वाचा: मुंबई: सतत आत्महत्येची धमकी देणं ही क्रूरताच! घटस्फोटानंतर पत्नीला 25 लाख आणि दोन फ्लॅट्स... हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

40 वर्षांचा तुरुंगवास 

आरोपी व्यक्तीला हल्ला आणि गुन्हेगारी धमकी दिल्याबद्दल पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली, तसेच स्वत:च्या अल्पवयीन मुलीला ओलीस ठेवल्याबद्दल तीन वर्षांची वेगळी शिक्षा सुनावण्यात आली. वेगवेगळ्या गुन्ह्यांबाबत सर्व शिक्षा एकाच वेळी चालतील. याचा अर्थ असा की त्याला किमान 40 वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागेल. तसेच, जर तो दंड भरण्यात अयशस्वी झाला तर त्याला अतिरिक्त 18 महिने शिक्षा होईल. 

हे ही वाचा: लंडनमध्ये नोकरी आणि व्हिसा मिळवून देण्याची ऑफर! परदेशात सेटल होण्याच्या नादात मुंबईतील जोडप्याची मोठी फसवणूक...

अपंग महिलेवर सुद्धा केला बलात्कार 

या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे संबंधित आरोपी ऑक्टोबर 2021 मध्ये एका अपंग महिलेवर बलात्कार केल्याबद्दल आणि फेब्रुवारी 2022 मध्ये पुन्हा तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे. आरोपी त्याच प्रकरणात जामिनावर बाहेर होता आणि त्याने लगेचच त्याच्या 11 वर्षांच्या मुलीला वासनेचं बळी बनवलं. 

हे वाचलं का?

    follow whatsapp