Maharashtra Weather : राज्यात गेल्या काही दिवसांपासून कडाक्याची थंडी पडत असताना हवामानात बदल दिसू लागला आहे. भारतीय हवामान विभाग (आयएमडी) आणि इतर हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, 21 नोव्हेंबर रोजी मध्य आणि दक्षिण महाराष्ट्रात आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असून, काही ठिकाणी थंडीची तीव्रता हळूहळू कमी होईल, तरीही पहाटे आणि संध्याकाळी गारवा जाणवेल. हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, नोव्हेंबर महिन्याच्या उत्तरार्धात उत्तर भारतात शीत वाऱ्यांचा प्रभाव कमी होत असल्याने किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे, जाणून घेऊयात राज्यातील हवामान विभागाचा 21 नोव्हेंबर रोजीचा अंदाज.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : पुण्याची गोष्ट : माणुसकीला सोडलं वाऱ्यावर, वृद्धाश्रमाच्या नावाखाली भर थंडीत 16 वयोवृद्ध रुग्ण उघड्यावर
कोकण विभाग :
कोकण विभागात रत्नागिरी, सिंधुदु्र्ग, मुंबई, पालघर आणि रायगड जिल्ह्याचा समावेश होतो. या जिल्ह्यांमध्ये तापमानात काही अंशी प्रमाणात फरक जाणवण्याची शक्यता आहे. तसे कोरड्या हवामानाचा अंदाज जारी करण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्र विभाग :
मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूरात हवामान विभागाने कोरड्या वातावरणाचा अंदाज जारी केला. तसेच तापमान स्थिर राहण्याची शक्यता आहे. पहाटे गार वारे वाहणार आहेत. नोव्हेंबर महिला अखेरीस काही प्रमाणात वातावरणात बदल निर्माण होण्याची शक्यता आहे.
मराठवा़डा विभाग :
मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या एकूण जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने कोरडं वातारवणाचा इशारा दिला आहे. तसेच तापमानात फारसा फरक जाणवणार नसल्याचा हवामान विभागाचा अंदज आहे.
विदर्भ विभाग :
मराठवाडा विभागातील अकोला, अमरावती, गोंदिया, नागपूर, वर्धा नाशिक, यवतमाळ, चंद्रपूर, बुलढाणा, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने कसलाही अंदाज जारी केलेला नाही.
हे ही वाचा : 20 दिवसांपूर्वीच विकत घेतली थार, ताम्हिणी घाटातील 500 फूट खोल दरीत कोसळली, भीषण अपघातात चौघांवर काळाचा घाला
महत्त्वाचं :
राज्यात थंडीची तीव्रता कायम राहील आणि किमान तापमानात घट होऊन काही प्रमाणात पावसाचा इशारा आहे.
ADVERTISEMENT











