जालन्यात 13 वर्षीय शाळकरी मुलीने उचललं टोकाचं पाऊल, शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत संपवलं आयुष्य

मुंबई तक

Jalna suicide : जालन्यात शिक्षणाच्या मंदिरात म्हणजेच शाळेत एका 13 वर्षाच्या विद्यार्थिनीने आपलं जीवन संपवल्याची मन काळीज पिळवटून टाकणारी घटना आहे. शहरातील सीटीएमके गुजराथी विद्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत टोकाचं पाऊल उचललं आहे.

ADVERTISEMENT

Jalna suicide
Jalna suicide
social share
google news

बातम्या हायलाइट

point

विद्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत आरोपीची आत्महत्या 

point

विद्यार्थ्यांच्या मनात भीतीचे वातावरण

point

जालन्यातीन मन हेलावून टाकणारी घटना

Jalna suicide : जालन्यात शिक्षणाच्या मंदिरात म्हणजेच शाळेत एका 13 वर्षाच्या विद्यार्थिनीने आपलं जीवन संपवल्याची मन काळीज पिळवटून टाकणारी घटना आहे. शहरातील सीटीएमके गुजराथी विद्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत टोकाचं पाऊल उचललं आहे. आत्महत्या केलेल्या मुलीचं नाव आरोपी आरोही दीपक बिटलान असे आहे. आत्महत्येमागील नेमकं कारण अद्यापही समोर आलेलं नाही. शिक्षकाने त्रास दिल्याने तिने आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला.

हे ही वाचा : चंद्रपूर हादरलं! हॉस्टेलमध्ये मानसिक त्रास, अखेर 17 वर्षाच्या तरुणाने दोर आवळत संपवलं जीवन, 'त्या' चौघांचं नाव समोर

विद्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत आरोपीची आत्महत्या 

मुलीने घेतलेल्या अशा निर्णयाने आई-वडिलांवर दुख:चा डोंगर कोसळला आहे. विद्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील छतावरून उडी घेत आरोहीने आत्महत्या केली आहे. या प्रकरणाची बातमी समोर येताच घटनास्थळी हळहळ व्यक्त केली जात आहे. 

मुलीच्या आत्महत्येसाठी तिच्या आई-वडिलांनी शिक्षकांनाच जबाबदार धरले आहे. शिक्षकांच्या त्रासामुळेच आरोहीने आत्महत्या केल्याचा कुटुंबीयांनी आरोप केलेला आहे. याचपार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी शिक्षकांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे.  

विद्यार्थ्यांच्या मनात भीतीचे वातावरण

मुलीने शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याने, विद्यार्थ्यांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाने या प्रकरणाचे एकूण गांभीर्य ओळखून, पालकांच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी आणि दोषींवर कारवाई करणे गरजेचे असल्याचं म्हटलं जात आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp