Leopard Attack Pune : राज्यभरात बिबट्याने धुमाकूळ घातला असून शहरात बिबट्यांनी केलेल्या हल्ल्याच्या घटनेत वाढ होताना दिसते. यामुळे आता नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे. पुणे जिल्ह्याच्या खे़ड तालुक्यातील निमगावात बिबट्याच्या हल्ल्याची माहिती आता समोर आली आहे. खेड येथील असलेल्या भोंडवेवस्तीतील एका शाळकरी मुलावर बिबट्याने हल्ला केला आहे. बिपट्याने हल्ला केलेल्या विद्यार्थ्याचे नाव गणेश भोंडवे असल्याचे सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : स्मृती मंदानाच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका, लेकीनं लग्न पुढं ढकलण्याचा घेतला निर्णय...
बिबट्याचा शाळकरी मुलावर हल्ला
दबा धरून बसलेला बिबट्या शिकारीच्या शोधार्थ असल्याचा अंदाज बांधल्यानंतर हा हल्ला करण्यात आला. बिपट्याने केलेल्या हल्ल्यात मुलगा जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. बिपट्याने हल्ला केलेल्या विद्यार्थ्याचा थोडक्यात जीव बचावला गेला आहे. अशातच आता या बिबट्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अशातच आता अकोला शहरातील न्यू तपाडियानगर येथे पहाटेच्या सुमारास नागरिकांना बिबट्या दिसल्याचे समजले. याबाबत वनविभागाने बिबट्या असल्याचं त्यांनी नाकारलं. अखेर पायाचे ठसे आणि इतर पुराव्यानुसार, बिबट्याच असल्याचे सांगण्यात आले आहे. अशातच याच भागात बिबट्याचा शोध सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा : 13 वर्षीय विद्यार्थिनीने केली मोबाईलची मागणी, मोबाईल देण्यास कुटुंबीयांकडून नकार, गळफास घेत उचललं टोकाचं पाऊल..
पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात बिबट्या शिरला
अशातच एक पोलीस कर्मचारी विलास बंकावार यांच्या घरातच बिबट्या शिरल्याची माहिती समोर आली. बंकावार यांच्या घरी पाहुणे आले होते. त्या पाहुण्यांना त्या बिबट्याला घराच्या पायरीवर बसलेले पाहिले. त्यानंतर बिबट्याने काच फोडत जिन्याहून उडी मारली. या घटनेनंतर आता वनविभाग आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. तेव्हा काही ठिकाणी बिबट्याचे ठसे दिसून आले होते. अशातच आता पोलीस बिबट्याचा शोध घेत आहेत.
ADVERTISEMENT











