स्मृती मंदानाच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका, लेकीनं लग्न पुढं ढकलण्याचा घेतला निर्णय...
Smriti mandhana Marriage : भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृति मंदानाचा आज 23 नोव्हेंबर रोजी सांगलीत लग्नसोहळा पार पडणार होता. पण, वडील श्रीनाथ यांना हृदयविकाराचा झटका आल्याने तिने या लग्नाबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृति मंदानाच्या विवाहाबाबत घेतला मोठा निर्णय
नातेवाकांनी दिली महत्त्वाची अपडेट
Smriti mandhana Marriage : भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृति मंदानाचा आज 23 नोव्हेंबर रोजी संगीत दिग्दर्शक पलाश मुच्छलशी सांगलीत लग्नसोहळा पार पडणार होता. पण याच लग्नसोहळ्याला कोणाची नजर लागली की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण लग्नसोहळा सुरु असतानाच स्मृति मंदानाचे वडील श्रीनिवास मंदाना यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे, हा विवाह पुढे ढकलण्यात आल्याची महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
हे ही वाचा : स्मृती मंदानाच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका, लेकीनं लग्न पुढं ढकलण्याचा घेतला निर्णय...
स्मृति मंदानाच्या मॅनेजरकडून महत्त्वाची अपडेट
स्मृतीच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी सकाळी नाश्ता केला होता. त्यानंतर त्याच्या तब्येतीत बिघाड झाला. आम्हाला वाटले की, त्यांची तब्येत लवकरच बरी होईल, पण त्यांची प्रकृती पाहता अॅम्बुलन्स बोलावून त्यांना रुग्णालयात पाठवण्यात आले. स्मृती मंदानाने वडिलांची प्रकृती बिघाडल्याने हा लग्नसोहळा पुढे ढकलण्याबाबत निर्णय घेतला आहे.
दरम्यान, माध्यमांनी स्मृती मंदानाच्या प्रकृतीबाबत विचारले असता सांगितले की, त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ते सध्या डॉक्टरांच्या निगरणाखाली आहेत. त्यांना डॉक्टरांनी अॅडमिट होण्यासाठी सांगितले होते. आम्हालाही थोडा धक्काच बसला आहे. आम्हालाही वाटते की, त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी, अशी माहिती दोहीन मिश्रा यांनी दिली आहे.
हे ही वाचा : सांगलीतील घरात लगीनघाई सुरु असतानाच स्मृती मंधानाच्या वडिलांची प्रकृती बिघडली
लग्नसमारंभाला खेळाडूंची मांदीयाळी
स्मृतीचा होणारा नवरा आणि संगीत दिग्दर्शक पलाश मुच्छलही रुग्णालयातच आहे. अशातच, वडीलांची प्रकृती अधिकच बिघडल्याचं सांगितलं जात आहे. परिस्थिती पाहता फार्महाऊसवरील डेकोरेशन काढण्याचे काम सुरु आहे. भारतीय महिला क्रिकेट टीमच्या सर्व खेळाडू अधीच सांगलीत दाखल झाल्या होत्या. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रोहित शर्मा, सौरभ गांगुली, व्ही व्ही लक्ष्मण, सोनू निगम,मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील या लग्नाचे निमंत्रण देण्यात आले होते.










