सांगलीतील घरात लगीनघाई सुरु असतानाच स्मृती मंधानाच्या वडिलांची प्रकृती बिघडली

मुंबई तक

लग्न समारंभाची तयारी सुरू असताना स्मृती मंधानाच्या वडिलांना हार्ट अटॅक आल्याचं वृत्त आहे.

ADVERTISEMENT

स्मृती मंधानाच्या वडिलांची प्रकृती बिघडली
स्मृती मंधानाच्या वडिलांची प्रकृती बिघडली
social share
google news

बातम्या हायलाइट

point

स्मृती मंधानाच्या वडिलांची प्रकृती बिघडली

point

सांगलीतील घरात लगीनघाई सुरु असतानाच दु:खद घटना

सांगली: सुप्रसिद्ध भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना आणि पलश मुच्छल यांचा आज म्हणजेच 23 नोव्हेंबर रोजी सांगलीत विवाह सोहळा पार पडणार होता. मात्र, सांगलीतील लग्नाच्या या आनंदी वातावरणात एक दु:खद घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. लग्न समारंभाची तयारी सुरू असताना स्मृतीच्या वडिलांची प्रकृती बिघडल्याचं वृत्त आहे. त्यांना तातडीने जवळच्या हॉस्पिटलमध्ये केले दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

स्मृती मानधना यांचे वडील श्रीनिवास मंधाना यांची अचानक हृदयविकाराच्या झटक्याने प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. स्मृतीसह तिचे जवळचे नातेवाईक वडिलांसोबत हॉस्पिटल मध्येच असल्यामुळे पाहुणे परतू लागले आहेत. तसेच, लग्नाचा सेटअप काढायला सुरवात झाली असून हा लग्न सोहळा रद्द होण्याची शक्यता आहे.  

लग्नस्थळावर मोठा बंदोबस्त तैनात

दुपारी 3.30 वाजता स्मृती आणि पलाश यांच्या विवाहचा मुहूर्त होता. या सोहळ्याची जोरदार तयारी करण्यात आली असून लग्न समारंभासाठी क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज मान्यवर सुद्धा उपस्थित आहेत. मात्र, अचानक स्मृती मंधानाच्या वडिलांची प्रकृती बिघडल्याने कुटुंबीय आणि पाहुण्यांमध्ये गोंधळ उडाला आहे. आता, लग्नस्थळावर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती आहे. 

लग्नाचा सेटअप काढला जात आहे 

या दु:खद घटनेनंतर, फॉर्म हाऊसची सजावट काढण्याचं काम सुरू झालं आहे. लग्नाचा सेटअप काढला जात आहे. तसेच, लग्न समारंभासाठी येणाऱ्या पाहुण्यांना परत पाठवलं जात आहे. या मोठ्या घटनेमुळे स्मृतीचा विवाह सोहळा रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp