तीन मुलांच्या आईचे विवाहबाह्य संबंध! गर्भात प्रियकराचं बाळ अन् महिलेचा 'तो' हट्ट, अखेर घडलं भयानक...
एका विवाहित महिलेची हत्या करून तिचा मृतदेह शेतात फेकून देण्यात आल्याची बातमी समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
तीन मुलांच्या आईचे विवाहबाह्य संबंध!
गर्भात प्रियकराचं बाळ अन् महिलेचा 'तो' हट्ट
अखेर, घडली भयानक घटना
Crime News: उत्तर प्रदेशच्या बस्ती जिल्ह्यातील एका गावातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेची हत्या करून तिचा मृतदेह शेतात फेकून देण्यात आला. 20 नोव्हेंबर रोजी बस्ती जिल्ह्यातील एका शेतात पोलिसांना एका विवाहित महिलेचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळला. महिलेची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली होती. मृतदेहाजवळ महिलेचा 2 वर्षांचा मुलगा रडताना आढळल्याचं धक्कादायक दृश्य होतं.
प्रियकरापासून राहिली गरोदर
प्रकरणातील मृत महिलेचं नाव प्रीती असून ती सिद्धार्थनगर जिल्ह्यातील बांसी येथे राहत होती. जेव्हा पोलीस महिलेच्या पतीकडे चौकशीसाठी पोहोचले तेव्हा या प्रकरणाला वेगळंच वळण मिळालं. तीन मुलांची आई असलेल्या प्रीतीचे तिच्या गावातील 28 वर्षीय दिलीप कुमार अग्रहरी नावाच्या तरुणासोबत काही काळापासून प्रेमसंबंध होते. चौकशीदरम्यान, दिलीपने बरेच धक्कादायक खुलासे केले. त्यांच्या प्रेमसंबंधातूनच प्रीती गर्भवती राहिली प्रीतीच्या गर्भात दिलीपचं बाळ वाढत होतं. दरम्यान, प्रीती तिच्या प्रियकरावर सतत पळून जाऊन लग्न करण्यासाठी दबाव आणत होती. प्रेयसी लग्नासाठी सतत आग्रह करत असल्यामुळे दिलीपने एक भयंकर योदना आखली.
हे ही वाचा: मुंबईची खबर: रेल्वे प्रवाशांनो! आता गर्दीच्या वेळेतच सेंट्रल रेल्वेवर लोकल ट्रेनची संख्या वाढणार, तब्बल 'इतक्या' गाड्या...
विवाहित प्रेयसीवर चाकूने वार अन्...
दिलीपने लग्नासाठी पळून जाण्याच्या बहाण्याने प्रीतीला बस्ती येथे बोलावलं. प्रीती तिच्या लहान मुलाला सोबत घेऊन आली. संधी मिळताच आरोपी दिलीपने प्रीतीच्या गळ्यावर निर्दयीपणे वार केले आणि तिची हत्या केली. हत्येचे पुरावे मिटवण्यासाठी त्याने मृतदेहाचे कपडे फाडले आणि दारू तसेच पाण्याच्या बाटल्या घटनास्थळी ठेवल्या, जेणेकरून पोलिसांना ही बलात्कारानंतर हत्येची घटना असल्याचं वाटेल. त्यानंतर दिलीपने मुलाला तिथेच रडताना सोडून तिथून पळ काढला. नंतर, वाटेने जाणाऱ्या एका स्थानिकाने तिथे मुलगा रडताना पाहिलं आणि लगेच पोलिसांना या घटनेबाबत कळवलं. मृत महिलेच्या सासूने पोलिसात नोंदवलेल्या तक्रारीवरून, रुधौली पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर, पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली.
हे ही वाचा: सांगलीतील घरात लगीनघाई सुरु असतानाच स्मृती मंधानाच्या वडिलांची प्रकृती बिघडली
नेमकं काय घडलं?
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पोलिसांनी कारवाई करून आरोपी दिलीप अग्रहरीला अटक केली आहे. हत्येत वापरलेला चाकू सुद्धा घटनस्थळावरून जप्त करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजवरून दिलीप घटनेपूर्वी प्रीतीसोबत होता, असं स्पष्ट झालं आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये बलात्काराची पुष्टी झाली नाही, त्यामुळे प्रेमसंबंध आणि नको असलेली गर्भधारणा हेच हत्येमागचं एकमेव कारण असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला असून आरोपीची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.










