तरुणाने अंघोळ करणाऱ्या महिलेचे अश्लील व्हिडिओ केले रेकॉर्ड, नंतर ब्लॅकमेल करत केली 'ती' मागणी, पीडितेनं छतावरून उडी मारत..

मुंबई तक

crime news :एका गावातील महिलेचा एका तरुणाने अंघोळ करतानाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. नंतर तिला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याशी लैंगिक संबंध ठेवले होते. महिलेच्या पतीला या घटनेची माहिती मिळताच त्याने तिला घराबाहेर हो असं सांगितलं. त्रासाला कंटाळून महिलेन त्यांच्या घराच्या छतावरून उडी मारली.

ADVERTISEMENT

crime news
crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

तरुणीने महिलेचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ कॅमेऱ्यात केला कैद 

point

पीडितेनं घराच्या छतावरून मारली उडी 

Crime news : उत्तर प्रदेशातील हाथरस येथील एका गावातील महिलेचा एका तरुणाने अंघोळ करतानाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. नंतर तिला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याशी लैंगिक संबंध ठेवले होते. महिलेच्या पतीला या घटनेची माहिती मिळताच त्याने तिला घराबाहेर हो असं सांगितलं. त्रासाला कंटाळून मगिलेन त्यांच्या घराच्या छतावरून उडी मारली, नंतर ती गंभीर दुखापतग्रस्त झाल्याचं सांगण्यात येत आहे. ही घटना 5 डिसेंबर रोजी घडली आहे. नंतर पीडितेनं आरोपीविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली. पोलिसांनी तक्रार नोंदवली आणि नंतर तिने 13 जानेवारी रोजी न्यायालयात धाव घेतल्याचं सांगण्यात येत आहे.

हे ही वाचा : ठाकरे गड राखणार की महायुती बाजी मारणार? BMC साठी उद्या मतदान, 'इतके' सुरक्षारक्षक तैनात

तरुणीने महिलेचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ कॅमेऱ्यात केला कैद 

घडलेल्या घटनेनुसार, शेजारी राहणाऱ्या तरुणाने महिला अंघोळ करतानाचा व्हिडिओ कैद केला. नंतर संबंधित व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देखील दिली होती. नंतर तिला अवैध संबंध करण्यास भाग पाडले गेले. पीडितेचा पती हा एका कापड कारखान्यात काम करतो. तो त्याच्या पत्नीला गाझियाबाद येथे घेऊन गेला, तिथे त्याला आपल्या पत्नीच्या अनैतिक संबंधाची माहिती मिळाली असता, त्याने पीडितेला आपल्या माहेरी जाण्यास सांगितलं.

पीडितेनं घराच्या छतावरून मारली उडी 

त्यानंतर तिने घराच्या छतावर चढून उडी मारली. या घटनेत तिच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाल्याचं सांगण्यात येत आहे. पीडित महिलेच्या पतीने सांगितलं की, त्याचा विवाह हा एका वर्षापूर्वी झाला होता. तो आपल्या पत्नीला सोबत घेऊन गाव सोडून गाझियाबादला आला होता. तेव्हा त्यांच्या शेजारी राहणाऱ्या एका तरुणाने त्या महिलेचा अंघोळ करतानाचा अश्लील व्हिडिओ बनवला. नंतर तरुणाने पीडितेला ब्लॅकमेल करून माझ्याशी बोल असं सांगितलं होतं. 

हे ही वाचा : डोकं आणि छातीत रक्तस्त्राव, 13 हून अधिक जखमा... सावत्र आई आणि बापाने मिळून चिमुकलीला संपवलं

नंतर आरोपीने पीडितेला आपल्यासोबत राहू नको असं सांगितलं होतं, मी फक्त तुझा वापर केला. तेव्हा पीडितेनं टेरेसावरून उडी मारली. संबंधित प्रकरणात आरोपी तरुणाविरुद्ध कारवाईची मागणी करण्यात आली आहे. या घटनेबाबत ती पोलीस ठाण्यात गेली होती, परंतु तिची बाजू ऐकली गेली नाही, असा आरोप करण्यात आला.

हे वाचलं का?

    follow whatsapp