प्रियकर सरकारी नोकरी मिळाल्यानंतर प्रेमाला विसरला, त्या' लोभापोटी दुसऱ्या तरुणीला केलं जवळ, पीडितेनं रेल्वेखाली संपवलं जीवन
crime news : खऱ्या प्रेमाच्या नात्याला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका 27 वर्षीय महिलेनं आत्महत्या केली आहे. आत्महत्येमागील कारण आता समोर आलं आहे. प्रियकराला सरकारी नोकरी मिळाल्यानंतर तो तिला सोडून गेला, यामुळे प्रेयसी ही मानसिकदृष्ट्या खचून गेली होती.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
दोघांचेही दिर्घकाळापासून प्रेमसंबंध
'त्या' लोभापोटी दुसऱ्या तरुणीशी विवाह करण्याचा निर्णय
रेल्वेरुळाखाली झोपून तरुणीचा अंत
Crime news : खऱ्या प्रेमाच्या नात्याला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका 27 वर्षीय महिलेनं आत्महत्या केली आहे. आत्महत्येमागील कारण आता समोर आलं आहे. प्रियकराला सरकारी नोकरी मिळाल्यानंतर तो तिला सोडून गेला, यामुळे प्रेयसी ही मानसिकदृष्ट्या खचून गेली होती. दरम्यान, महिलेचा मृतदेह हा रेल्वे रुळावर आढळला होता. या प्रकरणाने परिसरात भीतीचं वातावरण परसलं. पोलिसांनी घटनास्थळी येऊन प्रकरणाचा खोलवर तपास सुरु आहे. हे प्रकरण प्रेम आणि विश्वासघातामुळे घङल्याचं सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा : साताऱ्यात अघोरी प्रकार, घर फोडून जिमचे साहित्य चोरीस, नारळ,पान, हळदी कुंकूसह... परिसरात भीतीचं वातावरण
नेमकं काय घडलं?
मृत महिलेचं नाव कोम्मनी सीतरम्मा (वय 27) असे आहे. ती मैलाप देवरामपल्ली गावातील रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे. ती एका खासगी शाळेत शिक्षिकेचं काम करत होती. कुटुंबियांच्या म्हणण्यांनुसार, सीतारम्म एका सुशिक्षित आणि जबाबदार तरुणी होती. ती तिच्या भविष्याच्याबाबतीत चिंतेत होती. मुलीने उचललेल्या अशा कठोर पावलाने कुटुंबाला खूप मोठा धक्का बसला आहे. कुटुंबातील सदस्यांचे म्हणण आहे की, ती बऱ्याच काळापासून मानसिक तणावाखाली होती.
दोघांचेही दिर्घकाळापासून प्रेमसंबंध
पोलीस आणि कुटुंबातील सदस्यांच्या म्हणण्यांनुसार, सीराम्माचे जवळच्या गावातील गद्दम माणिक्य या तरुणाशी दीर्घकाळापासून प्रेमसंबंध होते. तसेच माणिक्य यांना अलीकडेच गुरुकुल शाळेत सरकारी नोकरी मिळाली. सरकारी नोकरी मिळाल्यानंतर त्यांचे वर्तन अचानकपणे बदलले, तेव्हापासून सीरम्माच्या अडचणीत वाढ होऊ लागल्याचं चित्र आहे.
हुंड्याच्या लोभापोटी दुसऱ्या तरुणीशी विवाह करण्याचा निर्णय
सरकारी नोकरी मिळाल्यानंतर माणिक्याने सीताराम्मापासून दूर राहण्यास सुरुवात केली होती. तसेच हुंड्याच्या लोभापोटी त्याने दुसऱ्या तरुणीशी विवाह करण्याचा निर्णय घेतला असा आरोप करण्यात आला. या बदलामुळे सीताराम्माला मोठा हादरा बसला. तिने माणिक्याला विचारले की, तो आपल्या लॉन्ग टर्म रिलेशनशीपनंतर असं का करतो? त्यावर तिला समाधानकारक उत्तर न मिळाल्याने तिने टोकाचं पाऊल उचललं.










