बॅरियर तोडून ट्रक झाला पलटी, पुणे-मुंबई महामार्गावरील भीषण अपघातात कारचा चेंदामेंदा, दोघांचा दुर्दैवी अंत...
Pune Accident : पुणे-मुंबई महामार्गावर एक भीषण अपघात झाला. या अपघातात पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने बॅरियर तोडलं. त्यानंतर ट्रकने थेट मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या लेनमध्ये प्रवेश केला. त्यानंतर समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात
दीड तास वाहतूक सुविधा ठप्प
किती मृत्यू आणि किती जखमी?
Pune Accident : पुणे-मुंबई महामार्गावर एक भीषण अपघात झाला. या अपघातात पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने बॅरियर तोडलं. त्यानंतर ट्रकने थेट मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या लेनमध्ये प्रवेश केला. त्यानंतर समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोराची होती की, ट्रक कारच्या समोरच उलटला. या धडकेत कारचा चेंदामेंदा झाल्याची महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
हे ही वाचा : स्मृती मंदानाच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका, लेकीनं लग्न पुढं ढकलण्याचा घेतला निर्णय...
भीषण अपघातात दोघांचा मृत्यू
या भीषण अपघातात चौघेजण गंभीर जखमी झाले असून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना आहे. परिस्थिती बघता, अपघातानंतर लवकरात लवकर मदतकार्य सुरु करण्यात आल्याचे चित्र आहे. गंभीर जखमींना सोमाटणे फाटा येथील पवना रुग्णालयात दाखल केले, अशातच आता त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली आहे.
दीड तास वाहतूक सुविधा ठप्प
या अपघातामुळे सकाळी येणाऱ्या वाहनांना वाहतूकीची समस्या निर्माण झाली. यामुळे दीड तास वाहतूक सुविधा ठप्प पडल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर दहा किमी अंतरापर्यंत वाहनांची रांग लागली होती. या अपघातानंतर रस्त्यात उभी असलेली वाहने चालकांनी जागा काढत बाजूला घेत एकमेकांना सहकार्य केले. त्यानंतर आता वाहतूक पुन्हा एकदा सुरळीत सुरु झाली.
हे ही वाचा : पैसा-पाणी: AI चा बुडबुडा फुटेल का.. कोणाचं आणि किती होईल नुकसान?
या प्रकरणात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास करणं सुरु ठेवले. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक ड्रायव्हरचं नियंत्रण सुटून हा भीषण अपघात झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.










