जालन्यातील तरुणाचे वहिनीसोबत अनैतिक संबंध, दीर-भाऊजयीने मिळून नवऱ्याला कुऱ्हाडीने हल्ल करत संपवलं

Jalna crime : जालन्यात अनैतिक संबंधात अडथळा निर्माण करणाऱ्या भावाचा भावानेच काटा काढल्याची धक्कादायक घटना बदनापूर परिसरात घडली आहे. संबंधित प्रकरणात बदनापूर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

Jalna crime

Jalna crime

मुंबई तक

14 Nov 2025 (अपडेटेड: 14 Nov 2025, 02:12 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

जालन्यात वहिनीचे लहान दिरासोबत अनैतिक संबंध

point

दोघेही पोलिसांकडून अटक

Jalna Crime : जालन्यात अनैतिक संबंधात अडथळा निर्माण करणाऱ्या भावाचा भावानेच काटा काढल्याची धक्कादायक घटना बदनापूर परिसरात घडली आहे. संबंधित प्रकरणात बदनापूर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. अटकेत असलेल्यांची नावे आता समोर आली आहेत. ज्ञानेश्वार राम तायडे (वय 28) आणि मनिषा परमेश्वर तायडे (वय 25) अशी अटकेत असणाऱ्यांची नावे आहेत.

हे वाचलं का?

हे ही वाचा : Bihar Election 2025 : मतमोजणी सुरु, बिहारभर कुठे रसगुल्ले तर कुठे 500 किलो लाडू, मिठाई अन्.. निकालापूर्वी जल्लोष

वहिनीचे लहान दिरासोबत अनैतिक संबंध

सोमाठाणा येथील मनिषा तायडे हिचे लहान दीर ज्ञानेश्वर तायडेसोबत अनैतिक प्रेमसंबंध होते. या संबंधांमध्ये पती परमेश्वर राम तायडे हा व्यक्ती अडथळा निर्माण होत होता. अशातच 15 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री 1 च्या सुमारास ज्ञानेश्वर आणि मनिषाने परमेश्वरच्या डोक्यात व चेहऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह हा प्लास्टिकच्या एका मुरघासमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आला होता.

त्यानंतर मृतदेहाला दगड बांधून वाल्हा-सोमठाणा तलावात फेकून देण्यात आला. ओळख पटवण्यासाठी तो मृतदेह हा बाहेर काढण्यात आला असता, तो मृतदेह हा परमेश्वर तायडेचा असल्याचं समोर आलं. मृत व्यक्ती परमेश्वर तायडे यांचे वडील राम नाथा तायडे यांच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आणि पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

हे ही वाचा : दिल्ली स्फोटातील संशयित आरोपी डॉ. उमरचे घर केलं जमीनदोस्त, सुरक्षा दलाची कारवाई, नेमकं काय घडलं?

दोघेही पोलिसांकडून अटक

या प्रकरणात बदनापूर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तात्काळपणे चक्रे फिरवत दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. मनिषा आणि ज्ञानेश्वर यांच्यातील असलेले अनैतिक संबंधांना परमेश्वरने विरोध केला होता, त्यामुळे संतापून दोघांनी मिळून परमेश्वरची हत्या केली. संबंधित प्रकरणात पोलिसांनी दोघांनाही अटक करत पुढील तपास सुरु ठेवला आहे. 

    follow whatsapp