जालना : दुचाकीवरुन आले अन् युवकावर तीन गोळ्या झाडल्या, शहराच्या मध्यवर्ती भागात तरुणाची हत्या

मुंबई तक

24 Jan 2026 (अपडेटेड: 24 Jan 2026, 08:50 AM)

Jalna Crime News : मिळालेल्या माहितीनुसार, चरण रायमल्लू हा आपल्या बुलेट दुचाकीवरून घाटी रोड परिसरातून जात असताना अचानक दुचाकीवरून आलेल्या 2 ते 3 जणांनी त्याच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी त्याच्यावर सलग 2 ते 3 गोळ्या झाडल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

Jalna Crime News

Jalna Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

जालना : दुचाकीवरुन आले अन् युवकावर तीन गोळ्या झाडल्या

point

शहराच्या मध्यवर्ती भागात तरुणाची हत्या

Jalna Crime News : जालना शहराच्या मध्यवर्ती भागात मंगळवारी गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. शहरातील नूतन वसाहत परिसरातील घाटी रोडवर दुचाकीवरून आलेल्या 2 ते 3 अज्ञात हल्लेखोरांनी एका युवकावर गोळ्या झाडल्या. या गोळीबारात चरण रायमल्लू (वय अंदाजे 27 वर्ष) या युवकाचा जागीच मृत्यू झालाय. 

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार, चरण रायमल्लू हा आपल्या बुलेट दुचाकीवरून घाटी रोड परिसरातून जात असताना अचानक दुचाकीवरून आलेल्या 2 ते 3 जणांनी त्याच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी त्याच्यावर सलग 2 ते 3 गोळ्या झाडल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

जखमी अवस्थेत चरण रायमल्लू याला तातडीने शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. दरम्यान, युवकाला 2 ते 3 गोळ्या लागल्याची शक्यता असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी दिली आहे.

हेही वाचा : 'देशात हिंदू राजकीय शक्ती बनेल हे भाजपला माहिती नव्हतं', बाळासाहेबांमुळेच... राज ठाकरे यांनी सांगितला 'तो' किस्सा

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. शहराच्या मध्यवस्तीत घडलेल्या या गोळीबारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना नेमकी कोणत्या कारणातून घडली, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नसून पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.

तरुणावर गोळीबार झाल्यानंतर प्रचंड रक्तस्राव झाला होता. त्यामुळे घटनास्थळीच त्याची प्रकृती अत्यंत नाजूक झाली होती. शहराच्या मध्यवर्ती भागात घडलेल्या या गोळीबाराच्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात दहशत आणि खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजसह अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या