जालना: शिक्षकाकडून 14 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, 'तसले' फोटो व्हायरल..

मुंबई तक

• 05:48 PM • 12 Jun 2026

Jalna crime : जालना शहरातून माणुसकीला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जिथे शिक्षकाने शाळेतील एका 14 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. नंतर त्याच विद्यार्थिनीचे खाजगी फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देखील दिली.

Jalna crime

Jalna crime

Google CTA

बातम्या हायलाइट

point

शिक्षकाने पीडितेचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची दिली धमकी

point

विक्की शिंदे विरोधात गुन्हा दाखल

Jalna Crime : जालना शहरातून माणुसकीला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जिथे शिक्षकाने शाळेतील एका 14 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. नंतर त्याच विद्यार्थिनीचे खाजगी फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देखील दिली. नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. शिक्षक वर्षभरापासून विद्यार्थिनीच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : सोलापूर: शेअर मार्केटचा नाद नडला, मुख्याध्यापकाने पत्नी व दोन मुलांना विष दिलं अन्..

या प्रकरणात जालन्यातील कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित आरोप शिक्षक विक्की शिंदे याला कदीम जालना पोलिसांनी ताब्यात घेत गुन्हा दाखल केला. या घटनेनं जालना शहरात एकच खळबळ उडाली आहे. अशातच आरोपीवर कठोर कारवाईची नागरिकांकडून मागणी होऊ लागली आहे. 

शिक्षकाने पीडितेचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची दिली धमकी

सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोपी शिक्षकाने विद्यार्थिनीशी संपर्क साधला. नंतर तिच्याशी जवळीक साधत तिच्यावर दबाव टाकला. तिचे खाजगी फोटो आरोपी शिक्षकाने मिळवले. नंतर तेच फोटो व्हायरल करण्याची धमकी देखील दिली. आरोपी शिक्षकाने महिन्यानंतर पुन्हा एकदा पीडितेकडे शारीरिक संबंधांसाठी आग्रह धरला होता. 

हे ही वाचा : जालना: सावत्र बापाचं अमानुष कृत्य, पैशांच्या वादातून चिमुरड्याचे हात पाय बांधून..

विक्की शिंदे विरोधात गुन्हा दाखल

मात्र, पीडिता मोठ्या मानसिक तणावाखाली असल्याने तिने हा संपूर्ण प्रकार तिच्या आईला सांगितला. आईने हा सर्व प्रकार पीडितेच्या वडिलांना सांगितला. नंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी तात्काळपणे पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेला सर्व प्रकार सांगितला. संबंधित प्रकरणात आरोपी विक्की शिंदे विरोधात गुन्हा दाखल केला असू पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणाचा पोलीस अधिकचा तपास करत आहेत.