Govt Jobs : जर तुम्ही सरकारी बँकेत नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदाने (Bank of Baroda) ग्रुप-हेड, टेरिटरी हेड आणि डेप्युटी मॅनेजर अशा विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठीची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून, 27 मार्चपासून अर्ज प्रक्रिया देखील सुरू झाली आहे.
ADVERTISEMENT
इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 16 एप्रिलपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. शेवटच्या तारखेची वाट न पाहता उमेदवारांनी वेळेत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन बँकेतर्फे करण्यात आले आहे.
पात्रता आणि वयोमर्यादा
या भरतीसाठी बँकेने काही विशिष्ट निकष निश्चित केले आहेत. उमेदवारांकडे मान्यताप्राप्त संस्थेतून पदवी (Graduation) असणे आवश्यक आहे. याशिवाय, संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी (Masters) किंवा मॅनेजमेंटमधील डिप्लोमा असणे अनिवार्य आहे. वयोमर्यादेबाबत बोलायचे झाले तर, पदानुसार किमान वय विविध प्रवर्गांनिसार 24, 27 आणि 31 वर्षे निश्चित करण्यात आले आहे, तर कमाल वयोमर्यादा 35, 40 आणि 45 वर्षे आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयात सवलत दिली जाईल; यामध्ये SC/ST उमेदवारांना 5 वर्षे, तर OBC उमेदवारांना 3 वर्षांची सवलत मिळेल.
हे ही वाचा : 'त्या' बंद दरवाजाचे गूढ, महाराष्ट्रातील 'या' सरकारी इमारतीचा पश्चिम दरवाजा का असतो बंद?
अर्जाचे शुल्क
या भरतीसाठी जनरल, EWS आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांना 850 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर SC, ST आणि दिव्यांग (PwD) प्रवर्गातील उमेदवारांसाठी 175 रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे.
हे ही वाचा : Personal Finance: रोज 200 रुपये गुंतवा अन् 20 लाख मिळवा.. नेमका फंडा काय?
'असा' करा अर्ज
उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. त्यानंतर होम पेजवरील 'रजिस्ट्रेशन' लिंकवर क्लिक करून आपली वैयक्तिक व शैक्षणिक माहिती अचूक भरावी. अर्ज भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन कॉपी अपलोड कराव्यात आणि शुल्क भरून अर्जाची प्रक्रिया पूर्ण करावी. भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंट काढून ठेवणे आवश्यक आहे.
ADVERTISEMENT











