Mumbai Metro Line 9 : मुंबईकरांच्या प्रवासाशी संबंधित एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मुंबईत लवकरच दोन नव्या मेट्रो लाईन्सचा शुभारंभ होणार आहे. काशीगाव आणि दहिसर दरम्यान मेट्रो लाईन 9 आणि डायमंड गार्डनर ते मंडाले मेट्रो 3 या लाईन्सच्या पहिल्या टप्प्याचे 3 एप्रिल रोजी उद्घाटन होणार असल्याची माहिती आहे. यासोबतच ठाणे-बोरीवली बोगदा आणि बीकेसी येथील पॉड टॅक्सी प्रणालीचे भूमिपूजन होण्याचीही शक्यता आहे.
ADVERTISEMENT
लवकरच लोकार्पण होणार
2025 साली एमएमआरडीएने या दोन्ही लाईन्सच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण केले होते. तेव्हाच या मेट्रो लाईन्स सुरु होणे अपेक्षित होते. मात्र महानगरपालिका निवडणूकीवेळी लागलेली आचारसंहिता आणि इतर काही कारणांमुळे लोकार्पण थांबवण्यात आले होते. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या लाईन्सचे आता लवकरच लोकार्पण होणार आहे. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित राहणार असल्याचे बोलले जात आहे.
हे ही वाचा : 'त्या' बंद दरवाजाचे गूढ, महाराष्ट्रातील 'या' सरकारी इमारतीचा पश्चिम दरवाजा का असतो बंद?
पॉड टॅक्सीही सुरु होणार
या मेट्रो लाईन्समुळे मिरा रोड ते अंधेरी पूर्व (गुंदवली) पर्यंत विनासायास प्रवास करता येणार आहे. तसेच पॉड टॅक्सीच्या लोकार्पणानंतर बीकेसी परिसरात प्रवास करणाऱ्यांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार आहे. वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक ते कुर्ला रेल्वे स्थानक या दरम्यान 8.8 किमीची ही पॉड टॅक्सीची सेवा सुरु होणार आहे.
हे ही वाचा : 31 मार्चला सूर्याचा रेवती नक्षत्रात प्रवेश, मार्च एंडनंतर 'या' राशींच्या लोकांचे आयुष्य बदलणार; नव्या संधी आणि बरंच काही..
मुंबईकरांचा प्रवास सुखकर होणार
या प्रकल्पांचे लोकार्पण झाल्यानंतर मुंबईकरांचा प्रवास सुपरफास्ट आणि सुखकर होणार आहे. मुंबईकर आधीच ट्राफिकने आणि उन्हामुळे त्रासलेला असताना या लोकार्पणामुळे काहीसा दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
ADVERTISEMENT











