Maharashtra Weather : राज्यात 'या' जिल्ह्यात अवकाळी पाऊस घालणार धुमाकूळ, जाणून घ्या हवामानाचा अंदाज

Maharashtra Weather : राज्यात सध्याचं हवामान हे अस्थिर होत असल्याचं दिसून येते. हवामानातील बदल हा सातत्याने दिसून येत आहे. कोकणात सध्या कोरडं हवामान असून उष्ण आणि दमट परिस्थिती निर्माण होईल. तसेच काही भागांमध्ये पावसाचं अस्मानी संकट ओढावण्याची दाट शक्यता आहे. 

Maharashtra Weather

Maharashtra Weather

मुंबई तक

• 05:00 AM • 29 Mar 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

राज्यात सध्याचं हवामान हे अस्थिर 

point

काही भागांमध्ये पावसाचं अस्मानी संकट

Maharashtra Weather : राज्यात सध्याचं हवामान हे अस्थिर होत असल्याचं दिसून येते. कोकणात सध्या कोरडं वातावरण असून उष्ण आणि दमट हवामानाची परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच काही भागांमध्ये पावसाचं अस्मानी संकट ओढावण्याची दाट शक्यता आहे. अशातच 29 मार्च 2025 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा पुढीलप्रमाणे अंदाज जारी करण्यात आला. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : बारामतीच्या महिलेचा कर्नाटकात मर्डर, जोडीने निघाले होते गाणगापूरला, वाटेत नवऱ्यासोबत बिनसले अन्..

कोकण

कोकणात रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, पालघर आणि ठाणे या जिल्ह्यांचा समावेश होतो यापैकी सर्वच जिल्ह्यांत हवामान कोरडं असेल अशी शक्यता आहे. तसेच उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज जारी करण्यात आला आहे. 

https://mausam.imd.gov.in/mumbai/mcdata/district.pdf

मध्य महाराष्ट्र 

मध्य महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. तसेच सांगली आणि सोलापूरमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

मराठवाडा 

मराठवाडा या विभागात जालना, छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, हिंगोली या जिल्ह्यांत कोरड्या हवामानाचा अलर्ट जारी केला आहे. नांदेड जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज जारी करण्यात आला. तसेच लातूर, धाराशिव या जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. 

हे ही वाचा : आरोपीने 8 वर्षाच्या मुलीची केली हत्या, नंतर मृतदेह पिठाच्या डब्यात भरला अन् पुढे...

विदर्भ 

विदर्भातील अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यात हवामान विभागाने कसलाही अलर्ट जारी केला नाही.