”रामराया” रामनामाचा दिव्य अनुभव देणारे नवे गीत रसिकांच्या भेटीला

सावनी रविंद्रच्या स्वरातील श्रीराम नवमीच्या मंगलमय पर्वावर भक्ती, अध्यात्म आणि संगीत यांचा सुंदर संगम घडवणारे “रामराया” हे नवे मराठी भजन रसिकांच्या भेटीला आले आहे.

ramraya a new song offering a divine experience of the name of ram arrives to delight music lovers

रामराया

मुंबई तक

• 11:30 PM • 28 Mar 2026

follow google news

मुंबईः श्रीराम नवमीच्या मंगलमय पर्वावर भक्ती, अध्यात्म आणि संगीत यांचा सुंदर संगम घडवणारे “रामराया” हे नवे मराठी भजन रसिकांच्या भेटीला आले असून, अल्पावधीतच या गाण्याने भाविकांच्या मनात आपले खास स्थान निर्माण केले आहे.

हे वाचलं का?

“राम कोण आहे? राम कसा आहे?” अशा अंतर्मुख करणाऱ्या प्रश्नांपासून सुरू होणारे हे भजन, केवळ एक गाणं न राहता ‘राम’ या संकल्पनेचा शोध घेणारी एक आध्यात्मिक यात्रा ठरते. सोबतीचा राम, मर्यादा पुरुषोत्तम राम, अंतरीचा राम, आदर्शाचा राम आणि नामसाधनेतला राम, या प्रत्येक रूपाचा अर्थ शब्द आणि सुरांच्या माध्यमातून उलगडत जातो.

या भावस्पर्शी भजनाचे गीत लेखन वर्षा राजेंद्र हुंजे यांनी अत्यंत संवेदनशीलतेने केले असून, प्रत्येक ओळीतून भक्तीची आणि विचारांची गूढ खोली जाणवते. राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका सावनी रविंद्र हिच्या मधुर आणि आत्मीय आवाजामुळे या गाण्याला विशेष उंची प्राप्त झाली आहे.

संगीतकार आणि संगीत संयोजक निनाद सोलापूरकर यांनी या भजनाला पारंपरिकतेचा स्पर्श देत आधुनिकतेची सुंदर जोड दिली आहे.

विशेष म्हणजे, बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या सहकार्याने आणि श्रिया क्रिएशन यांच्या निर्मितीतून हे गाणे साकारले आहे.

आजच्या धकाधकीच्या जीवनात ‘राम’ या संकल्पनेचा अर्थ नव्याने समजून देणारे “रामराया” हे भजन प्रत्येकाच्या अंतःकरणाला स्पर्श करते. हे गाणे श्रिया क्रिएशनच्या युट्युब चॅनलवर उपलब्ध असून, भक्तीभावाने न्हालेला हा सुरेल अनुभव नक्कीच रसिकांनी अनुभवावा, असाच आहे.

“रामराया” हे फक्त एक भजन नाही… तर प्रत्येकाच्या अंतरी दडलेल्या ‘रामा’चा शोध घेण्याचा एक सुरेल प्रयत्न आहे!