Kalyan Crime : कल्याण रेल्वेस्थानक परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सिगारेट पेटवण्यासाठी माचिस न दिल्याने तरुणाने कोयता काढून दहशत माजवल्याची घटना आहे. या प्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी संबंधित तरुणांना अटक केली आहे. अटकेत असलेल्यांची नावे आता समोर आली आहेत. निलेश शेलार आणि मेघनाथ भंडारी अशी त्यांची नावे आहेत. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : भारताने महिला विश्वचषकावर नाव कोरल्यानंतर पाकिस्तानच्या शोएब अख्तरने दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
कोयता काढला आणि शिवीगाळ केली...
कल्याणच्या रेल्वेस्थानक परिसरात दारूच्या नशेत दोघेजण आले आणि त्यांनी खिशातून सिगारेट काढली. त्यानंतर टपरीचालकाला माचिसची मागणी केली असता, त्याने माचिस देण्यास नकार दिला होता. याच कारणावरून संतप्त झालेल्या दोन तरुणांनी कोयता काढला आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. हातात कोयता धरून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. या एकूण प्रकाराचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.
'एकेकाला खल्लास...'
संबंधित व्हिडिओ दोन तरुण दिलत असून दोघांपैकी एकाने नागरिकांना शिवीगाळ करताना दिसत आहे. तर, दुसरा तरुण हातात कोयता घेऊन उभा दिसत आहे. आमच्या नादाला लागू नका, एकेकाला खल्लास करून टाकेन, अशी धमकी दिली. हा सर्व धक्कादायक प्रकार एका उपस्थिताने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. त्यानंतर तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
हे ही वाचा : सिंधुदुर्गात भाजप पदाधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून फुलविक्रेता आफताब शेखची आत्महत्या, रोहित पवारांचा आरोप
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. दरम्यान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण परदेशी यांनी तपासासाठी पथकांनी नेमणूक केली आणि संबंधित पथकांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
ADVERTISEMENT











