IND vs ENG, 3rd Test : इंग्लंडने टीम इंडियाच्या तोंडचा घास पळवला! 'ही' आहेत भारताच्या पराभवाची 5 कारणे

India vs England, 3rd Test : लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर भारतीय क्रिकेट संघाचा पराभव झाला. चौथ्या दिवसाच्या शेवटच्या तासापूर्वी भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर होता. पण

India vs England, 3rd Test Match Update

India vs England, 3rd Test Match Update

मुंबई तक

• 10:57 PM • 14 Jul 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

या खेळाडूंमुळे टीम इंडियाचा झाला पराभव

point

इंग्लंडने तिसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा केला पराभव

point

जाणून घ्या भारताच्या पराभवाची कारणे

India vs England, 3rd Test : लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर भारतीय क्रिकेट संघाचा पराभव झाला. चौथ्या दिवसाच्या शेवटच्या तासापूर्वी भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर होता. पण पाचव्या दिवशी इंग्लंडने हा सामना खिशात घातला. इंग्लंडच्या संघाने आता टेस्ट सीरिजमध्ये 2-1 ने आघाडी घेतली आहे. टीम इंडियाला इंग्लंड विरोधात झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात पराभव का पत्कारावा लागला? इंग्लंडच्या संघाने टीम इंडियाला कसं केलं पराभूत? काय आहेत भारताच्या पराभवाची कारणे, जाणून घेऊयात.

हे वाचलं का?

या 5 कारणांमुळे टीम इंडियाचा झाला पराभव 

शुबमन गिल

टीम इंडियाच्या पराभवाचं सर्वात मोठं कारण शुबमन गिलचं अॅटीट्यूड..मागील दोन टेस्ट मॅचमध्ये दोन शतक आणि एक द्निशतक ठोकणाऱ्या शुबमन गिलने लॉर्ड्समध्ये धावा करण्याशिवाय सर्वकाही केलं. म्हणजे गिल इंग्लंडच्या फलंदाजांना भिडलाच, पण अंपायर्सवरही तो नाराज झाल्याचं पाहायला मिळालं. गिलने पहिल्या डावात फक्त 16 धावा केल्या. तर दुसऱ्या इनिंगमध्ये त्याने फक्त 6 धावा केल्या. 

हे ही वाचा >> भाजप आमदारांची 'ती' ऑडिओ क्लिप व्हायरल! अश्लील भाषा वापरून अधिकाऱ्याला केली शिविगाळ?

ऋषभ पंतने केली ती चूक

टीम इंडियाच्या पराभवाचं दुसरं मोठं कारण म्हणजे, ऋषभ पंतचं रनआऊट होणं..पहिल्या डावात पंतने अप्रतिम कामगिरी करत 74 धावा केल्या. पण केए राहुलच्या शतकासाठी तो रन आऊट झाला. पंत रनआऊट झाल्याने टीम इंडियाला मोठा धक्का बसला. भारतीय संघ पहिल्या डावात इंग्लंडवर मोठं लीड घेऊ शकत होतं. पण तसं झालं नाही. भारत आणि इंग्लंडचा संघ दोघांनीही 387 धावाच केल्या.

63 धावा पडल्या टीम इंडियाला महागात

टीम इंडिया आक्रमक अंदाजात खेळताना दिसते. पण लॉर्ड्समध्ये अतिआक्रमकता टीम इंडियाला महागात पडली. के.एल.राहुल, रविंद्र जजेजा, नितीश रेड्डी, शुबमन गिल, मोहम्मद सिराज सर्वच फलंदाज  इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर फोल ठरले. त्यामुळे टीम इंडियाचा निसटता पराभव झाला. भारतीय संघाने दोन्ही डावात एकूण 63 अतिरिक्त धावा दिल्या.

हे ही वाचा >> हॉटेलच्या रुममध्ये तरूणीला घेऊन गेला, अन् नंतर.. बॉयफ्रेंडचं कृत्य तुम्हालाही टाकेल हादरवून

ते 4 विकेट..

पहिल्या डावात टीम इंडियाने इंग्लंडप्रमाणेच 387 धावा केल्या. या धावा वाढू शकल्या असत्या, पण भारतीय संघाने पहिल्या इनिंगमध्ये फक्त 11 धावांवर 4 विकेट्स गमावल्या. टीम इंडियाच्या टेल एंडर्सनेही खास कामगिरी केली नाही, त्यामुळे पराभवाला सामोरं जावं लागलं.

केल राहुलची ती चूक

के एल राहुलने पहिल्या इनिंगमध्ये इंग्लंडचा विकेटकीपर जेमी स्मिथचा कॅच सोडला होता. त्यावेळी हा खेळाडू फक्त पाच धावांवर खेळत होता. पण जीवनदान मिळाल्याने स्मिथने 51 धावांची अर्थशतकी खेळी केली. यामुळे इंग्लंडचा संघ 387 धावांवर पोहोचला.

    follow whatsapp