ऐन दिवाळीत कोल्हापूर-राधानगरी रस्त्यावर भीषण अपघात, भाऊबीजेपूर्वी भावासह बहिणीचा चिरडून मृत्यू

Kolhapur Accident : ऐन दिवाळीत कोल्हापूर राधानगरी मार्गावरील कौलव ते सिरसे दरम्यान, 21 ऑक्टोबर रोजी मंगळवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचाही जागीतच मृ्त्यू झाला असून त्यातील एकजण गंभीरपणे जखमी झाल्याचे वृत्त आहे.

Kolhapur Accident

Kolhapur Accident

मुंबई तक

22 Oct 2025 (अपडेटेड: 22 Oct 2025, 04:31 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

ऐन दिवाळीत आयशर टेम्पोच्या धडकेत तिघांचा मृत्यू

point

भाऊबीज सणापूर्वी दुर्घटना

Kolhapur Accident : ऐन दिवाळीत कोल्हापूर राधानगरी मार्गावरील कौलव ते सिरसे दरम्यान, 21 ऑक्टोबर रोजी मंगळवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचाही जागीतच मृ्त्यू झाला असून त्यातील एकजण गंभीरपणे जखमी झाल्याचे वृत्त आहे. एका आयशर या वाहनाने मोटारसायकलला धडक देत चिरडलं आहे. या धडकेत तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना आहे. या घटनेनं ऐन दिवाळीत शोक व्यक्त केला जात आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : ऐन दिवाळीत वृद्ध महिलेच्या गळ्यावर दिवसाढवळ्या चाकूने वार, घटनास्थळी रक्ताचे वाहिले पाट, पोलिसंही चक्रावले

आयशर टेम्पोच्या धडकेत तिघांचा मृत्यू

मिळालेल्या एकूण माहितीनुसार, आयशर टेम्पो एमएच 14 DM 1834 हे वाहन राधानगरीहून कोल्हापूराच्या दिशेने वेगाने निघाले होते. त्याचदरम्यान, भोगावतीकडून राधानगरीकडे चार जण मोटारसायकलवरून जात असताना, कौलव येथील श्री दत्त मंदिराशेजारी टेम्पो उलट्या दिशेने आला असता, त्या टेम्पोने मोटार सायकलला धडक दिल्याची दुर्घटना आहे. या भीषण अपघातात श्रीकांत बाबासो कांबळे आणि त्यांची पुतणी कौशिका सचिन कांबळे राहणार तरसांबळे यांचा जागूच मृत्यू झाला. 

तर श्रीकांतची बहीण दिपाली गुरुनाथ कांबळे आणि तिचा मुलगा अथर्व गुरुनाथ कांबळे राहणार शेंडूर कागल तालुका हे गंभीरपणे जखमी झाले. दोघांनाही तात्काळपणे सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले, याच उपचारादरम्यानस एकाचा मृ्त्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

हे ही वाचा : Maharashtra Weather : ऐन दिवाळी सणाला पावसाचं सावट, राज्यातील 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट

अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे आता कोल्हापूरातील राधानगरी मार्गावरील वाहूतक व्यवस्था ही काही वेळ विस्कळीत झाली होती. या प्रकरणात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरु केला असता, अपघाताने परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. 

    follow whatsapp