कोल्हापूर हादरलं! आईवरून शिवीगाळ केल्यानं संतापलेल्या मित्राचा दगडाने ठेचून केला खून

Kolhapur crime : कोल्हापूरातील विक्रमनगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. दारुच्या नशेत केल्याच्या कारणावरून चिडून मित्रानेच मित्राच्या डोक्यात दगडाने हल्ला करत ठार केलं.

Kolhapur crime

Kolhapur crime

मुंबई तक

04 Jan 2026 (अपडेटेड: 04 Jan 2026, 05:05 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

कोल्हापूरातील विक्रमनगर परिसरात धक्कादायक घटना

point

'त्या' कराणावरून मित्राने घेतला मित्राचा जीव

Kolhapur Crime : कोल्हापूरातील विक्रमनगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. दारुच्या नशेत केल्याच्या कारणावरून चिडून मित्रानेच मित्राच्या डोक्यात दगडाने हल्ला करत ठार केलं. ही घटना शनिवारी 3 जानेवारी रात्री घडल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विकास दत्तात्रेय भोसले (वय 33) असे मृत तरुणाचे नाव होते. या प्रकरणी आता आरोपी ओंकार महादेव काळे (वय 25) याला रात्री अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : कमळ निशाणीवर उमेदवाराला दिलं तिकीट, आता भाजपच म्हणतंय हा आमचा उमेदवार नाही, उल्हासनगरात काय घडलं?

नेमकं काय घडलं? 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास काळे हा मूळचा शाहूवाडी तालुक्यातील रहिवासी आहे. तो आपल्या वैयक्तिक कामानिमित्त कोल्हापुरात पाच ते दहा वर्षांपासून राहत होता. त्याचे आई वडील आणि कुटुंबीय हे आपल्या गावी राहत होते. नंतर त्याने काही वर्षे एका खासगी फॅक्टरीत नोकरी करत होते, असे सांगण्यात येत आहे.

मित्राने घेतला मित्राचा जीव

दरम्यान, तरुणाची विक्रमनगर परिसरातील राहणाऱ्या ओंकार काळे यांच्यासोबत मैत्री होती. दोघेही अगदी जवळचे मित्र होते. ते शनिवारी दोघेही दिवसभर एकत्रच होतं. रात्री दारू पिण्यासाठी दोघेही जोशी गल्ली परिसरात गेले, त्या ठिकाणी त्यांनी काही वेळ एकमेकांशी गप्पा मारल्या होत्या. नंतर बोलण्याच्या काही कारणावरून दोघांमध्ये मोठा वाद उफळला.

हे ही वाचा : 'बडोद्यात सगळे महापौर हे गुजराती का होतात? मुंबईत मराठीच महापौर', राज ठाकरेंचा भाजपला करडा सवाल अन्...

ओंकारकडून विकासला मारहाण 

ओंकारने शिवीगाळ करत विकास याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याने दारूच्या नशेत त्याच्या डोक्यात दगडाने हल्ला केला. त्यामुळे विकास हा गंभीर जखमी झाला. परिसरात नागरिकांना त्याला जखमी अवस्थेत सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती. अशातच पोलिसांनी आरोपी ओंकार काळेच्या मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणी पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील, सहायक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतल्याचं वृत्त आहे.

    follow whatsapp