Govt Job: अभियांत्रिकी क्षेत्रात मिळवा आकर्षक पगाराची सरकारी नोकरी! NALCO अंतर्गत मोठ्या पदांसाठी भरती...

नालको (NALCO) कडून ग्रॅज्युएट इंजीनिअर ट्रेनी पदाच्या 100 हून अधिक रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी 2 जानेवारी रोजी अर्जाची प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवार 22 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज करून शकतात.

NALCO अंतर्गत मोठ्या पदांसाठी भरती...

NALCO अंतर्गत मोठ्या पदांसाठी भरती...

मुंबई तक

• 02:28 PM • 04 Jan 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

अभियांत्रिकी क्षेत्रात मिळवा आकर्षक पगाराची सरकारी नोकरी!

point

NALCO अंतर्गत मोठ्या पदांसाठी भरती...

NALCO Recruitment: अभियांत्रिकी म्हणजेच इंजीनिअरिंग क्षेत्रांतील गेट (GATE) ही महत्त्वाची परीक्षा दिलेल्या उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. नालको (NALCO) कडून ग्रॅज्युएट इंजीनिअर ट्रेनी पदाच्या 100 हून अधिक रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी 2 जानेवारी रोजी अर्जाची प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवार 22 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज करून शकतात. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना nalcoindia.com या नालकोच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अप्लाय करावं लागेल. 

हे वाचलं का?

नालको म्हणजेच नॅशनल अॅल्युमिनिअम कंपनी लिमिटेड (NALCO) ही भारत सरकारच्या नवरत्न सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (PSU) कंपनी आहे, ज्याचा मुख्य व्यवसाय अॅल्युमिनियम उत्पादनाशी संबंधित आहे. 

काय आहे पात्रता? 

या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून फूल टाइम मॅकेनिकल इंजीनिअरिंग/ इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग/ पॉवर इंजीनियरिंग/ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग/ केमिकल इंजीनियरिंग/ एमटेक या क्षेत्रात डिग्री असणं आवश्यक आहे. मात्र, त्यासोबत उमेदवाराकडे ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूड टेस्ट इन इंजीनिअरिंग (GATE-2025) चं स्कोरकार्ड असणं गरजेचं आहे. याच आधारे उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवलं जाईल आणि गेट स्कोर तसेच इंटरव्ह्यूचे गुण मिळून उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल. 

हे ही वाचा: कल्याण: सासुने 60 वर्षीय मित्रासोबत मिळून केली सुनेची हत्या! संपत्ती आणि नोकरीच्या वादातून भयानक घटना

वयोमर्यादा 

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी कमाल 30 वर्षे अशी उमेदवारांसाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तसेच, 22 जानेवारी या तारखेच्या आधारे उमेदवारांच्या वयाची गणना केली जाईल. यासोबतच, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सूट दिली जाणार आहे. 

हे ही वाचा: अहिल्यानगर: रात्री बाप-लेकात वाद अन् पहाटे एकाच दोरीने गळफास घेऊन संपवलं जीवन! भयानक घटनेनं जामखेड हादरलं...

किती मिळेल पगार? 

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 40,000 ते 1,40,000 रुपये मासिक वेतन दिलं जाईल.  

संबंधित भरतीसाठी अर्ज करण्यासाठी जनरल (Open), ओबीसी (OBC) आणि ईडब्ल्यूएस (EWS) प्रवर्गातील उमेदवारांना 500 रुपये शुल्क भरावं लागेल. तसेच डिपार्टमेंटल उमेदवारांना मिळून इतर अर्जदारांना 100 रुपये शुल्क भरावं लागणार आहे. 

    follow whatsapp