मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आता भाविकांनी प्रचंड गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. बॉलिवूड सेलिब्रिटी आणि दिग्गज नेतेही लालबागच्या राजाचं दर्शन घेत आहेत. दुसरीकडे सामान्य भाविकांनीही राजाच्या दरबारात मोठी गर्दी केली आहे. अत्यंत भक्तीपूर्ण वातावरणात लाडक्या बाप्पाचं दर्शन सुरू झालं आहे. याशिवाय मुंबई Tak वर आपल्याला लालाबागच्या राजाची लाइव्ह आरती देखील पाहता येणार आहे.
