Delhi Blast: अखेर मृतांची यादी आली समोर, कार स्फोटात अनेक तरूणांनी गमावला हकनाक जीव!

Delhi Blast Death List: राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या शक्तिशाली स्फोटात अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेक जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, जखमी आणि मृतांची नावे असलेली यादी जारी करण्यात आली आहे.

list of dead and injured in delhi blast revealed many youths lost their precious lives in car blast

Delhi Blast Death list (फोटो: एएफपी)

मुंबई तक

• 12:10 AM • 11 Nov 2025

follow google news

नवी दिल्ली: दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ आज (10 नोव्हेंबर) झालेल्या शक्तिशाली स्फोटाने राष्ट्रीय राजधानी हादरली. लाल किल्ल्याजवळ झालेल्या या विनाशकारी स्फोटानंतर प्रमुख राज्यांमधील पोलीस हाय अलर्टवर आहेत. या स्फोटात अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला, तर बरेच जण जखमी झाले आहेत. दरम्यान, नुकतीच या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी जारी करण्यात आली आहे. 

हे वाचलं का?

काही मृतांची ओळख पटली तर काही मृतदेहाची ओळख परेड सुरू

यादीनुसार, उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील हसनपूर येथील मंगोलरा येथील रहिवासी अशोक कुमार याचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. जगवंश सिंह यांचा मुलगा अशोक कुमार हा 34 वर्षांचा होता.

स्फोटातील मृतांची यादी

  1. अशोक कुमार, वय 34 वर्ष - (मूळ रहिवासी, उत्तर प्रदेश)
  2. अज्ञात (अद्याप ओळख पटलेली नाही)- वय साधारण 35 वर्ष
  3. अज्ञात (अद्याप ओळख पटलेली नाही)- वय साधारण 52 वर्ष
  4. अज्ञात (अद्याप ओळख पटलेली नाही)- वय साधारण 35 वर्ष
  5. अज्ञात (अद्याप ओळख पटलेली नाही)- वय साधारण 58 वर्ष
  6. अज्ञात (अद्याप ओळख पटलेली नाही)- वय साधारण 28 वर्ष
  7. अज्ञात (अद्याप ओळख पटलेली नाही)- वय साधारण 30 वर्ष
  8. अज्ञात (अद्याप ओळख पटलेली नाही)- वय साधारण 35 वर्ष

हे ही वाचा>> Delhi Car Blast: स्फोट झाला 'त्या' कारचा मालक सापडला, नावही आलं समोर...

स्फोटातील जखमींची यादी

  1. शायना परवीन, वय 23 वर्ष - (मूळ रहिवासी, दिल्ली)
  2. हर्षूल सेठी, वय 28 वर्ष - (मूळ रहिवासी, उत्तराखंड)
  3. शिवा जैसवाल, वय 32 वर्ष - (मूळ रहिवासी, उत्तर प्रदेश)
  4. समीर, वय 26 वर्ष - (मूळ रहिवासी, दिल्ली)
  5. जोगिंदर, वय 28 वर्ष - (मूळ रहिवासी, दिल्ली)
  6. भवानी शंकर शर्मा, वय 30 वर्ष - (मूळ रहिवासी, दिल्ली)
  7. गीता, वय 26 वर्ष - (मूळ रहिवासी, दिल्ली) 
  8. विनय पाठक, वय 50 वर्ष - (मूळ रहिवासी, दिल्ली)
  9. पप्पू, वय 53 वर्ष - (मूळ रहिवासी, आग्रा)
  10. विनोद सिंग, वय 55 वर्ष - (मूळ रहिवासी, दिल्ली)
  11. शिवम झा, वय 21 वर्ष - (मूळ रहिवासी, दिल्ली)
  12. अज्ञात (पुरूष), वय 26 वर्ष 
  13. मोहम्मद शहनवाज, वय 35 वर्ष - (मूळ रहिवासी, दिल्ली)
  14. अंकुश शर्मा, वय 28 वर्ष - (मूळ रहिवासी, दिल्ली)
  15. मोहम्मद फारूख, वय 55 वर्ष - (मूळ रहिवासी, दिल्ली)
  16. तिलक राज, वय 45 वर्ष - (मूळ रहिवासी, हिमाचल प्रदेश)
  17. मोहम्मद सफवान, वय 28 वर्ष - (मूळ रहिवासी, दिल्ली)
  18. मोहम्मद दौड, वय 31 वर्ष - (मूळ रहिवासी, दिल्ली)
  19. किशोरी लाल, वय 42 वर्ष - (मूळ रहिवासी, दिल्ली)
  20. आझाद, वय 34 वर्ष - (मूळ रहिवासी, दिल्ली)

हे ही वाचा>> Delhi Blast: लाल किल्ला कार स्फोटानंतर राहुल गांधींची प्रतिक्रिया, पाहा ट्वीटमध्ये नेमकं काय

 

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सायंकाळी 6.52 वाजता एका कारमध्ये शक्तिशाली स्फोट झाला. हा स्फोट हरियाणाची नंबर प्लेट असलेल्या i20 Hyundai कारमध्ये झाला. स्फोटापूर्वी गाडी सिग्नलजवळ थांबली होती. असा दावा केला जात आहे की कारमध्ये तीन लोक होते. कारच्या मागील बाजूस स्फोट झाला आणि घटनास्थळी कोणताही खड्डा आढळला नाही. जखमी किंवा मृतांच्या शरीरावर कोणतेही खिळे किंवा तार आढळलेले नसल्याची पुष्टी प्रशासनाने केली आहे. एनआयएसह अनेक एजन्सी या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची प्रतिक्रिया

'लाल किल्ल्याजवळ सुभाष मार्ग ट्रॅफिक सिग्नलजवळ i20 Hyundai गाडीमध्ये एक स्फोट झाला आहे. या स्फोटामुळे जवळपासच्या काही गाड्या आणि त्याच रस्त्याने जाणाऱ्या काही लोक जखमी झाल्याचं वृत्त आहे. प्राथमिक माहिती जी मिळाली आहे त्यामध्ये काही लोकांचा मृत्यू झाल्याचंही समजतं आहे.' 

'स्फोटाची माहिती मिळताच 10 मिनिटातच दिल्ली क्राइम ब्रँच, दिल्ली स्पेशल ब्रँच यांच्या टीम घटनास्थळी पोहचल्या. NSG आणि NIA च्या टीम FSL सह कसून तपास करत आहेत. आसपासच्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे आणि बाकी सगळ्या गोष्टींच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.' 

'मी दिल्लीच्या पोलीस आयुक्तांशी देखील चर्चा झाली आहे, स्पेशल ब्रँचच्या  तपास अधिकाऱ्याशी देखील चर्चा झाली आहे. हे दोघेही आता घटनास्थळी आहेत. आम्ही सर्व शक्यता तपासून पाहत आहोत. सर्व शक्यता लक्षात घेऊन या स्फोटाची सखोल चौकशी करू.' 

'चौकशीअंती जी माहिती समोर येईल ती आम्ही जनतेसमोर ठेऊ. मी काहीच वेळात घटनास्थळी जात आहे आणि दवाखान्यात देखील तात्काळ जाणार आहे.' अशी प्राथमिक माहिती अमित शाह यांनी दिली आहे.
 

    follow whatsapp