Lok sabha Security : अमोल शिंदेसह तिघं चांगलेच फसले, दाखल झाला UAPA!

रोहिणी ठोंबरे

14 Dec 2023 (अपडेटेड: 14 Dec 2023, 08:11 AM)

संसदेत घुसखोरी करणाऱ्या आरोपीविरुद्ध UAPA म्हणजेच संसद उल्लंघन प्रकरण अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे की, अटक केलेल्या चार आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 452, कलम 120-B, 153, 186, 353 गुन्हेगारी कट आणि UAPA च्या कलम 16 आणि 18 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

lok sabha security breach news Police Filed Case under UAPA on 4 Accused

lok sabha security breach news Police Filed Case under UAPA on 4 Accused

follow google news

Parliament Security Breach : संसदेत घुसखोरी करणाऱ्या आरोपीविरुद्ध UAPA (Unlawful Activities Prevention Act) म्हणजेच संसद उल्लंघन प्रकरण अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे की, अटक केलेल्या चार आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 452, कलम 120-B, 153, 186, 353 गुन्हेगारी कट आणि UAPA च्या कलम 16 आणि 18 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (lok sabha security breach news Police Filed Case under UAPA on 4 Accused)

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी सागर, अमोल, मनोरंजन आणि नीलम यांना अटक करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या सर्व कलमान्वये या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच आता दिल्ली पोलिसांचे स्पेशल सेल या प्रकरणाचा तपास करणार आहे.

वाचा : अमोल शिंदेच्या मदतीला महाराष्ट्राच्या ‘या’ वकिलाची धाव, कायदेशीर लढा देणार!

संसदेतल्या सुरक्षेतील त्रुटींच्या चौकशीचे गृह मंत्रालयाचे आदेश!

त्याचवेळी केंद्रीय गृह मंत्रालयाने 13 डिसेंबरच्या रात्री या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेशही जारी केले. गृह मंत्रालयाने ट्वीटरवर पोस्ट करून ही माहिती दिली. मंत्रालयाने लिहिले, “लोकसभा सचिवालयाच्या विनंतीवरून, गृह मंत्रालयाने संसदेतल्या सुरक्षेतील त्रुटींच्या घटनेच्या चौकशीचे आदेश जारी केले आहेत.

सीआरपीएफचे महासंचालक अनिश दयाल सिंग यांच्या नेतृत्वाखाली एक चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यात इतर सुरक्षा एजन्सी आणि तज्ञ देखील सहभागी आहेत.”

वाचा : ‘…तर माझ्या मुलाला फाशी द्या’, मनोरंजनाच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले

गृह मंत्रालयाने पुढे सांगितले की, “चौकशी समिती संसदेतील सुरक्षेतील त्रुटींच्या कारणांची चौकशी करेल. त्रुटी ओळखून पुढील कारवाईची शिफारस करेल. चौकशी समिती शक्य तितक्या लवकर संसदेतील सुरक्षा सुधारण्यासाठी आपल्या शिफारशी आणि सूचना सादर करेल. तसंच शिफारशींसह अहवालही सादर करेल. ”

13 डिसेंबरला लोकसभेत नेमकं काय घडलं?

या संपूर्ण घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी लोकसभेच्या महासचिवांनी गृहमंत्रालयाला पत्र लिहिले होते. 13 डिसेंबर रोजी संसदेत दोन घुसखोरांनी प्रेक्षक गॅलरीतून लोकसभेच्या कक्षेत उडी मारली. दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी सभागृहात कामकाज सुरू होते. त्यानंतर अचानक दोन जणांनी संसदेत उड्या मारल्या. सागर आणि मनोरंजन अशी त्यांची नावे आहेत.

वाचा : भावाच्या प्रेयसीला दहाव्या मजल्यावरून दिले ढकलून, सगळी घटना सीसीटीव्हीत कैद

या दोन्ही आरोपींनी बुटांमध्ये कलरफुल स्मॉग कॅंडल्सचे डबे लपवले होते. त्यांनी बुटांमधून हे स्मॉग कॅंडल्सचे डबे काढून लोकसभेच्या सभागृहात उडवण्यास सुरुवात केली. हा सगळा प्रकार पाहून एकच गोंधळ उडाला.

अनेक खासदारांनी मिळून दोघांनाही धारेवर धरले. तोपर्यंत सुरक्षा कर्मचारीही आत आले. यानंतर सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. 2001 मध्ये संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या 22 व्या वर्धापनदिनादिवशीच हा घुसखोरीचा धक्कादायक प्रकार घडला.

    follow whatsapp