पुणे : 'या' कारणामुळे हॉस्पिटलमध्ये ठेवला बॉम्ब, आरोपीचा धक्कादायक खुलासा

मुंबई तक

• 09:18 AM • 16 May 2026

पुणे येथील हडपसर परिसरातील उषाकिरण हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवणाऱ्या आरोपीला आज (16 मे) पहाटे विमानाने पुण्यात आणण्यात आले आहे. आरोपीने पोलिसांना काय सांगितले? जाणून घेऊया

PUNE HOSPITAL BOMB NEWS

PUNE HOSPITAL BOMB NEWS

Google CTA

बातम्या हायलाइट

point

पुणे : 'या' कारणामुळे हॉस्पिटलमध्ये ठेवला बॉम्ब,

point

आरोपीचा धक्कादायक खुलासा

Pune Hospital Bomb News : पुणे येथील हडपसर परिसरातील उषाकिरण हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवणाऱ्या आरोपीला आज (16 मे) पहाटे विमानाने पुण्यात आणण्यात आले आहे. आरोपी शिवाजी राठोड याला काल नागपूरमध्ये महाराष्ट्र एटीएसने (दहशतवाद विरोधी पथक) अटक केली होती.

हे वाचलं का?

पुण्याहून नागपूरला पळाला

पोलीस तपासात समोर आले आहे की, आरोपी पुण्याच्या मांजरी भागात राहत होता. त्याच्या घराची झडती घेतली असता, आयईडी (इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाइस) तयार करण्यासाठी वापरण्यात आलेला एक रिकामी बॉक्स जप्त करण्यात आला आहे. घटनेनंतर आरोपी फरार होऊन पुण्याहून नागपूरला पळून गेला होता, जिथून पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला अटक केली.

हे ही वाचा : धुळे : बायकोसमोर रागावल्याने मुलगा संतापला, डोक्यात मुसळ घालून आई-वडिलांची हत्या

'इतक्या' रुपयात तयार केला बॉम्ब

आरोपीला आज विमानाने पुण्यात आणण्यात आले आहे. या प्रकरणात एक धक्कादायक माहितीही समोर आली आहे की, आरोपीने अवघ्या 400 रुपयांत हा बॉम्ब तयार केला होता. 

हे ही वाचा : फडणवीसांचा राखीव प्रवर्गाबाबतचा 'तो' निर्णय वादात का आलाय? टीकेचा सूर, माजी खासदार भडकले...

बॉम्ब ठेवण्यामागे कारण काय?

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, आरोपीकडे स्वतःच्या उपचारासाठी पुरेसे पैसे नव्हते. याच कारणामुळे त्याने डॉक्टरांकडून कथितपणे खंडणी वसूल करण्याच्या उद्देशाने हा संपूर्ण कट रचला होता. आता पुणे पोलिसांकडून आरोपीची पुढे सखोल चौकशी केली जाईल, ज्यामुळे या प्रकरणात आणखीही मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.