MSC Bank Jobs : रोजगाराच्या शोधात असलेल्या महाराष्ट्रातील तरुण-तरुणींसाठी एक उत्तम संधी निर्माण झाली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने विविध पदांच्या एकूण 139 रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून निवडलेल्या उमेदवारांना संपूर्ण महाराष्ट्रात नियुक्ती दिली जाणार आहे.
ADVERTISEMENT
'या' पदांसाठी भरती
या भरती प्रक्रियेत एकूण चार वेगवेगळ्या पदांचा समावेश आहे. यामध्ये ट्रेनी ज्युनियर ऑफिसरच्या 49 जागा, ट्रेनी असोसिएटच्या 81 जागा, ट्रेनी टायपिस्टच्या 04 जागा आणि ट्रेनी ड्रायव्हरच्या 05 जागा भरल्या जाणार आहेत. वेगवेगळ्या पदांसाठी शैक्षणिक पात्रताही वेगवेगळी निश्चित करण्यात आली आहे. अधिकारी आणि असोसिएट पदांसाठी 50% गुणांसह पदवी आवश्यक असून, टायपिस्ट पदासाठी पदवीसोबतच मराठी 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. टायपिंगचा वेग असणे अनिवार्य आहे. तसेच ड्रायव्हर पदासाठी किमान 10 वी उत्तीर्ण आणि हलके वाहनचालक परवाना (LVM) असणे गरजेचे आहे.
हे ही वाचा : मुंबईची खबर : मान्सूनला का होतोय विलंब? मुंबईकरांना कधीपर्यंत करावी लागणार प्रतीक्षा?
अर्जाचे शुल्क किती?
उमेदवारांची वयोमर्यादा 1 जून 2026 रोजी गृहीत धरली जाईल. त्यानुसार ट्रेनी ज्युनियर ऑफिसरसाठी 23 ते 35 वर्षे, ट्रेनी असोसिएट आणि टायपिस्टसाठी 21 ते 32 वर्षे, तर ट्रेनी ड्रायव्हर पदासाठी 18 ते 30 वर्षांपर्यंत वयाची अट ठेवण्यात आली आहे. अर्ज शुल्काबाबत बोलायचे झाल्यास ट्रेनी ज्युनियर ऑफिसरसाठी 1760 रुपये आणि उर्वरित पदांसाठी 1180 रुपये परीक्षा शुल्क आकारले जाणार आहे.
हे ही वाचा : मृतदेहांच्या प्रायव्हेट पार्टबाबत टिप्पणी करणाऱ्या सेजल पवारला झटका, KEM ची मोठी कारवाई
अर्जाची शेवटची तारीख
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 जुलै ही आहे. या भरती प्रक्रियेतील अधिक तपशील, अटी व शर्ती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी बँकेने जारी केलेली मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अधिक माहितीसाठी msc.bank.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
ADVERTISEMENT











