Maharashtra Weather : राज्यात 'या' भागांत पाऊस, तर काही ठिकाणी उष्णतेची लाट

मुंबई तक

• 05:00 AM • 13 Jun 2026

Maharashtra Weather : राज्यात मान्सूनपूर्व परिस्थिती निर्माण झाली असून उष्णता आणि पावसाचा दुहेरी प्रभाव कायम असून हवामान विभागाने विविध भागांसाठी वेगवेगळा अलर्ट वर्तवण्यात आला आहे. राज्यातील जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Maharashtra Weather

Maharashtra Weather

Google CTA

बातम्या हायलाइट

point

राज्यात मान्सूनपूर्व परिस्थिती

point

राज्यात दुहेरी हवामानाचा प्रभाव

Maharashtra Weather : राज्यात मान्सूनपूर्व परिस्थिती निर्माण झाली असून उष्णता आणि पावसाचा दुहेरी प्रभाव कायम असून हवामान विभागाने विविध भागांसाठी वेगवेगळा अलर्ट वर्तवण्यात आला आहे. राज्यातील जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच विदर्भातील 3 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट वर्तवला आहे. अशातच जाणून घेऊयात 13 जून 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : गुंगीच्या पाच गोळ्या देत शेतात नेलं, 9-10 वर्षाच्या मुलीवर नको तेच..

कोकण 

कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड या चार जिल्ह्यांना हवामान विभागाने उष्णतेचा यलो अलर्ट जारी केला आहे. याच भागातील तापमान हे सरासरी राहण्याची अधिक शक्यता आहे. तर दुसरीकडे रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट वर्तवला आहे. 

उत्तर महाराष्ट्र 

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांना कोणताही अधिकृतपणे अलर्ट वर्तवलेला नाही, मात्र तरीही या जिल्ह्यांना हलका ते मध्यम स्वरुपाचा अंदाज आहे. 

पश्चिम महाराष्ट्र 

राज्यातील पश्चिम महाराष्ट्रात सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्टचा अंदाज आहे. तर पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांत कोणाताही अलर्ट वर्तवला नसला तरीही ढगाळ वातावरणासह अधूनमधून पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणाहून वादळी वारे वाहू शकतात. 

मराठवाडा 

मराठवाडा विभागातील बीड, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्टचा अंदाज आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर, परभणी, जालना आणि हिंगोली या जिल्ह्यांना कोणाताही अलर्ट वर्तवण्यात आलेला नाही. 

हे ही वाचा : सोलापूर: मुख्याध्यापकाला 'तो' नाद नडला, आधी पत्नी व दोन मुलांना विष दिलं अन्..

विदर्भ 

विदर्भात हवामान बदलताना दिसून येते. अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांना उष्णतेचा अलर्ट वर्तवण्यात आला आहे. वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांना उष्णतेचा ऑरेंज अलर्टचा अंदाज आहे. तसेच भंडारा, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्टची शक्यता वर्तवण्यात आली.