Maharashtra Weather : राज्यातील हवामानात काही प्रमाणात चढ-उतार होताना दिसत आहे. तसेच बहुतांश भागात थंडीची लाट पसरल्याचं बघायला मिळत आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीगनरह विदर्भात थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता आहे. तर 24 डिसेंबर रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : BMC Election 2026: शिवसेनेने बहुमत नसतानाही कसं मिळवलेलं 2017 मध्ये मुंबईचं महापौर पद? सगळा इतिहास अन् इंटरेस्टिंग माहिती
कोकण विभाग :
कोकणात थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. तसेच याच विभागातील मुंबई आणि उपनगरात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. किमान तापमानात 1 अंश सेल्सिअसने घट होईल. मुंबई कमाल तापमान 17 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 32 अंश सेल्सिअस इतके राहील, असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे.
मध्य महाराष्ट्र विभाग :
मध्य महाराष्ट्रातील पुणे, सांगली,सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यात गारठा कायम राहण्याची शक्यता आहे. तसेच नाशिक आणि जळगावमध्ये शीतलहरी अनुभवायला मिळतील असा हवामानाचा अंदाज आहे.
मराठवाडा विभाग :
मराठवाडा विभाग या विभागातील छत्रपती संभाजीनगरासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. तसेच काही अंशी प्रमाणात गारठा कमी झाला होता. पण आता पुन्हा एकदा थंडावा वाढण्याची शक्यता आहे. याच विभागात 9 ते 11 अंश सेल्सिअस दरम्यान तापमान राहण्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे.
हे ही वाचा : पित्याने मुलाला दुध आणायला पाठवले, पिसाळलेल्या बापानं अल्पवयीन लेकीचा गळा चिरला, हादरवणारं प्रकरण
विदर्भ विभाग :
विदर्भ विभागातील नागपूरमध्ये किमान तापमान हे 9 अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे. तसेच पुढील काही दिवस विदर्भात गारवा असाच कायम राहण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT











