Maharashtra Weather: कोकण आणि घाटमाथ्यावर मान्सून सक्रिय, 'या' ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी

Maharashtra Weather Today: राज्यातील हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मान्सून हा कोकण आणि घाटमाथ्यावर सक्रिय राहणार आहे. एकूण राज्यातील मान्सूनची परिस्थिती जाणून घेऊयात. 

Maharashtra Weather

Maharashtra Weather

मुंबई तक

• 06:00 AM • 23 Jul 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

राज्यातील हवामानाचा अंदाज

point

कोकण आणि घाटमाथ्यावर मान्सून सक्रिय

Maharashtra Weather : राज्यातील हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मान्सून हा कोकण आणि घाटमाथ्यावर सक्रिय राहणार आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोराचा मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.तर हवमान विभागाने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मान्सूनचा येलो अलर्ट जारी केला आहे. तर आता एकूण राज्यातील मान्सूनची परिस्थिती जाणून घेऊयात. 

हे वाचलं का?

हेही वाचा : शिक्षकाने इयत्ता आठवीच्या विद्यार्थीनीचं केलं लैंगिक शोषण, सायंकाळी उलट्या झाल्या, आईला समजताच...

कोकणातील मान्सून स्थिती 

कोकणातील पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये जोराचा मान्सून दाखल होईल. रायगड आणि रत्नागिरीत काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तापमान 25-32 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. आर्द्रता 80-90% असेल, असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे.  

पश्चिम महाराष्ट्रतील या ठिकाणी भूस्खलनाचा धोका 

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूरात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर सांगलीत दुपारी किंवा संध्याकाळी जोराचा मान्सून दाखल होणार आहे. घाटमाथ्यावर भूस्खलनाचा धोका कायम आहे. शेतकऱ्यांनी पिकांचे नुकसान टाळण्यासाठी खबरदारी घ्यावी. 

मराठवाड्यातील मान्सूनस्थिती

मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना आणि परभणीत तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपात मान्सून अपेक्षित असणार आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.  तापमान 26-33 अंश सेल्सिअस दरम्यान राहील, असा हवमान विभागाने अंदाज वर्तवलेला आहे. 

हेही वाचा : पुण्यातील कोंढव्यात तरुणीने डिलिव्हरी बॉयविरोधात खोटा बनाव रचला, अन् स्वत:च अडकली पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?

विदर्भ 

विदर्भातील नागपूर, अमरावती आणि वर्धा येथे बहुतांश ठिराणी मध्यम स्वरुपाचा मान्सून दाखल होणार असल्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी 50 ते 100 मिमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागपूर येथे हवेची गुणवत्ता संवेदनशील लोकांसाठी रोगट असू शकते, असा हवामान विभागाने अंदाज जारी केला आहे. 

    follow whatsapp