ADVERTISEMENT
Maharashtra Weather : महाराष्ट्रात थंडीची लाट आणखी वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) नुसार राज्यात तापमानात आणखी घट होण्याची शक्यता वर्तवली असून, नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. यापैकी उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात थंडी अधिक तीव्र असेल, तर कोकणात तुलनेने थंडी मध्यम असेल असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे.
हे ही वाचा : 'ठाकरेंची युती म्हणजे 'खोदा पहाड़ और निकला चूहा' युतीच्या घोषणेनंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
विभागातील शहरांतील हवामान अंदाज:
कोकण विभाग :
कोकण विभागात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर आणि मुंबईचा समावेश होतो. यापैकी मुंबईत कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस, किमान 20 अंश सेल्सिअस. आकाश मुख्यतः निरभ्र राहील, सकाळी धुके असण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र विभाग :
मध्य महाराष्ट्र या विभागातील पुणे शहरात कमाल तापमान हे 30 अंश सेल्सिअस, तर किमान 9 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. तर सकाळी धुके आणि थंडीमुळे दृश्यमानता कमी होऊ शकते.
मराठवाडा विभाग :
या विभागात छत्रपती संभाजीनगरात कमाल 29 अंश सेल्सिअस, किमान 12 अंश सेल्सिअस तापमानाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : ग्रहांच्या हालचालीचा काही राशींना होणार लाभ, 'या' राशीतील लोकांनी आरोग्य आणि आर्थिक बाबतीत सतर्क राहावं
विदर्भ विभाग :
विदर्भ विभागात कमाल तापमान हे 28 अंश सेल्सिअस, तसेच किमान तपमान हे 11 अंश सेल्सिअस राहिल असा हवामान विभागाने अंदाज जारी केला आहे. तसेच काही ठिकाणी थंडी आणि धुक्याचे साम्राज्य निर्माण होईल, यामुळे सकाळी सावधगिरी बाळगावी.
ADVERTISEMENT











