Govt Job: फ्रेशर्स उमेदवारांसाठी सरकारी बँकेत काम करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. बँक ऑफ इंडिया कडून एक नवी भरती जाहीर करण्यात आली असून या भरतीच्या माध्यमातून बँकिंग क्षेत्रात कार्याचा कोणत्याच प्रकारचा अनुभव नसलेल्या म्हणजेच फ्रेशर्स उमेदवारांना सरकारी बँकेत काम करण्याची संधी मिळणार आहे. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी 25 डिसेंबर 2025 पासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे आणि इच्छुक उमेदवार 10 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज करू शकतात.
ADVERTISEMENT
उमेदवारांना स्टायपेंड सुद्धा मिळेल...
'बँक ऑफ इंडिया'च्या या भरतीच्या माध्यमातून देशभरातील विविध शाखांमध्ये अप्रेन्टिसच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीमध्ये नियुक्त झालेल्या उमेदवारांना 'बँक ऑफ इंडिया' या मोठ्या सरकारी बँकेत अनुभव घेता येणार आहे. अप्रेन्टिसशिपच्या काळात उमेदवारांना स्टायपेंड सुद्धा दिलं जाणार आहे. बँकिंग क्षेत्रात करिअरची सुरूवात करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी हा चांगला पर्याय असणार आहे.
हे ही वाचा: नागपूर: मॅट्रिमोनिअल साइटवर महिला पोलिसाशी मैत्री, लग्नाचं आश्वासन देऊन लॉजवर नेलं... पण शेवटी नको ते घडलं!
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा
या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशनची डिग्री किंवा केंद्र सरकारद्वारे मिळालेली इतर कोणतीही समकक्ष पात्रता असणं आवश्यक आहे. तसेच, या भरतीसाठी उमेदवारांसाठी किमान 20 वर्षे आणि कमाल 28 वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली असून 1 डिसेंबर 2025 तारखेच्या आधारे उमेदवारांच्या वयाची गणना केली जाईल.
हे ही वाचा: Raj-Uddhav Thackeray: मराठी माणसांच्या मनातला 'तो' क्षण, राज-उद्धव यांची युती जाहीर!
किती मिळेल स्टायपेंड?
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 13,000 रुपये स्टायपेंड दिलं जाईल.
कसा कराल अर्ज?
1. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम nats.education.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
2. त्यानंतर, Student Register/Login Section मध्ये जाऊन रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्डच्या साहाय्याने लॉगिन करा.
3. आता, BOI बँकेत अप्रेन्टिस पदाशी संबंधित लिंकवर क्लिक करून फॉर्म भरा.
4. यामध्ये वैयक्तिक माहितीसोबत शैक्षणिक आणि इतर माहिती भरा.
5. आवश्यक माहिती भरल्यानंतर, फोटो आणि सही स्कॅन करून अपलोड करा.
6. शेवटी, अर्जाचं शुल्क भरून फॉर्म सबमिट करा आणि त्याची प्रिंटआउट काढून ती भविष्यासाठी सुरक्षितरित्या ठेवा.
लेखी परीक्षेत सामान्य/आर्थिक जागरूकता, इंग्रजी भाषा, क्वांटिटेटिव्ह आणि रीजनिंग अॅप्टिट्यूड तसेच कंप्यूटर नॉलेज यावर विषयांवर आधारित 100 गुणांचे 25 प्रश्न विचारले जातील. त्यानंतर, उमेदवारांची स्थानिक भाषा चाचणी सुद्धा घेण्यात येईल.
ADVERTISEMENT











