Maharashtra Weather : भारत हवामान विभागाने (आयएमडी) राज्यासाठी 17 नोव्हेंबर रोजी हवामान विभागाकडून हवामान अंदाज जाहीर केला आहे. नोव्हेंबर महिन्यातील शेवटच्या टप्प्यात राज्यात सामान्यतः कोरडे आणि उष्ण हवामान राहण्याची शक्यता आहे. मुंबई, मराठवाडा आणि विदर्भ या भागातील हवामान विभागाने हवामानाचा अंदाज जारी केला आहे. जाणून घेऊयात 17 ऑक्टोबर रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : अभिजीत बिचुकलेंनी ठोकले शड्डू, साताऱ्याला सितारा करणार म्हणत, उदयनराजेंचं नाव न घेता म्हणाले, मलाही...
कोकण विभाग :
कोकण विभागात रत्नागिरी, सिंधुदु्र्ग, मुंबई, पालघर आणि रायगड जिल्ह्याचा समावेश होतो. अशातच आता तापमानात कुठेतरी घट होईल. यापैकी मुंबईमध्ये तापमान 26 ते 32 अंश सेल्सिअस राहील,तसेच हवामान कोरडे राहिल असा देखील हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे.
मध्य महाराष्ट्र :
मध्य महाराष्ट्रातील महत्त्वाचं शहर म्हणून पुणे शहराकडे पाहिलं जातं. या पुणे शहरात कोरडे हवामान राहिल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. तसेच या विभागात धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक या भागात काही ठिकाणी थंडीची लाट असेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
मराठवाडा विभाग :
मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी थंडीची लाट असेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. तर धाराशीव, लातूर या जिल्ह्यात कोरड्या हवामानाचा अंदाज आहे.
हे ही वाचा : पुण्याची गोष्ट : 15 प्रवाशांनी भरलेल्या चालत्या बसला भीषण आग, ड्रायव्हरने जीवाची बाजी लावत केलं मोठं काम, अग्नीशमन दलाने..
विदर्भ विभाग :
विदर्भात गोंदिया जिल्ह्यातील काही भागांमध्ये काही ठिकाणी थंडीची लाट असेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. तसेच विदर्भातील इतर उर्वरित जिल्ह्यांत हवामान विभागाने कसलाही अंदाज जारी केलेला नाही.
ADVERTISEMENT











