पुण्याची गोष्ट : 15 प्रवाशांनी भरलेल्या चालत्या बसला भीषण आग, ड्रायव्हरने जीवाची बाजी लावत केलं मोठं काम, अग्नीशमन दलाने..

मुंबई तक

Pune News : पिंपरीतून भोसरीकडे जाणाऱ्या पीएमपीएलच्या बसला 16 नोव्हेंबर रोजी रविवारी भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित भीषण अग्नीतांडवाचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. ही घटना सकाळच्या सुमारास 12:45 वाजता लोखंडी कामगार भवनासमोर घडली आहे.  या बसमध्ये 15 प्रवासी थोडक्यात बचावले आहे. 

ADVERTISEMENT

Pune news
Pune news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पीएमपीएल बसला पिंपरीत भीषण आग 

point

ड्रायव्हरने जीवाची बाजी लावत...

Pune News : पिंपरीतून भोसरीकडे जाणाऱ्या पीएमपीएलच्या बसला 16 नोव्हेंबर रोजी रविवारी भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित भीषण अग्नीतांडवाचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. ही घटना सकाळी 11 वाजताच्या सुमारास लोखंडी कामगार भवनासमोर घडली आहे.  या बसमध्ये 15 प्रवासी थोडक्यात बचावले आहे. 

हे ही वाचा : अभिजीत बिचुकलेंनी ठोकले शड्डू, साताऱ्याला सितारा करणार म्हणत, उदयनराजेंचं नाव न घेता म्हणाले, मलाही...

पीएमपीएल बसला पिंपरीत भीषण आग 

दरम्यान, अग्निशामन दिलाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी पीएमपीएल बस पिंपरीहून भोसरीकडे रवाना झाली असता, ही धक्कादायक घटना घडली. तेव्हा बसमधील ड्रायव्हर, कंडक्टर आणि 15 प्रवासी होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात बस थांबल्यानंतर ही बस नेहरूनगरकडे निघाली असता, लोखंडी कामगार भवनासमोर बसच्या इंजिनमधून धूर निघत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. 

ड्रायव्हरने जीवाची बाजी लावत...

या बसमध्ये यांत्रिक दरवाजे असल्याने दरवाजा उघडण्यास वेळ लागला. तेव्हा ड्रायव्हरने जावाची बाजी लावत दरवाजे उघडे केले आणि प्रवाशांना सतर्कतेचा इशारा देत सुरक्षितरीत्या खाली उतरवण्यात यश मिळवले. तसेच प्रवासी बाहेर पडताच बसने पेट घेतला. तेव्हा नागरिकांना अग्निरोधक यंत्र वापरून आग विझवण्याचा प्रयत्न केला; मात्र, काही वेळानंतर आग लागली.

हे ही वाचा : 'त्याने आपल्या बहिणीलाही सोडलं नाही तिच्यासोबत...' बापानेच मुलाच्या डोक्यात विट घालून दोघांना हाताशी धरत संपवलं

चालकाने तत्काळ अग्निशामक दलाला माहिती देण्यात आली की, एक बंब घटनास्थळी दाखल झालेला आहे. अग्नीशामन दलाने शर्थीचे प्रयत्न देखील केले आहे. तसेच बस जळून खाक झाली होती. पेट घेतलेली बस पाहण्यासाठी परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचं चित्र होतं. या घटनेमुळे वाहतुक सुविधा काही वेळ ठप्प असल्याचे सांगण्यात येत होते. 

हे वाचलं का?

    follow whatsapp